Paaru Serial New Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन पाठिंबा देताना दिसत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेचे कथानक पारू या पात्राभोवती फिरताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर पारू व आदित्य या जोडीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. सध्या मालिकेत दिशाचे प्रीतम, प्रियाविरोधातील नवनवीन डाव यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या नव्या प्रोमोमध्ये मालिकेत ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रीतम व पारू प्रियाला भेटायला आलेले असतात.तेव्हा प्रीतम प्रियावरील प्रेमाची कबुली देतो आणि प्रिया सुद्धा प्रीतम वरील प्रेमाची कबुली देते. तितक्यात हे सगळं काही आदित्य ऐकत असतो. आदित्य म्हणतो तू दारू, सिगारेट या मुलीसाठी सोडशील तसंच आई व भावाला सुद्धा सोडशील का?, हे ऐकल्यावर सगळेजण आदित्यकडे पाहून आश्चर्यचकित होतात. मात्र पारू, प्रिया व प्रीतम आदित्यसमोर दिशाचं खरं रूप आणतात आणि आदित्य यासाठी प्रीतमला साथ देण्याचा निर्णय घेतो.
दिशा अहिल्याला म्हणते, “माझ्या आणि प्रीतमच्या लग्नाला आता फक्त २० दिवस बाकी आहेत. आमचं लग्न व्यवस्थित पार पडेल ना?” त्यावर अहिल्या दिशाचा हात हातात घेते आणि म्हणते, “दिशा, मी तुला वचन देते. तुझं आणि प्रीतमचं लग्न मी निर्विघ्नपणे पार पाडेन.” तर दुसऱ्या दृश्यात पाहायला मिळते की, प्रिया, प्रीतम, पारू व आदित्य हे एकत्र आले असून, आदित्य प्रीतमला वचन देत म्हणतो, “तुझं आणि प्रियाचं लग्न मी निर्विघ्नपणे पार पाडेन.”
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्य-प्रीतममध्ये दुरावा, प्रियाबरोबरच नात समोर आलं आणि…; मालिकेत मोठा ट्विस्ट
“दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम, कोण जिंकेल ही प्रेमाची लढाई…?”, असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीवरुन हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. आता प्रीतमचे लग्न नक्की कोणाबरोबर होईल, आदित्य व पारू प्रीतमला प्रियाबरोबर लग्न करण्यासाठी कशी मदत करणार, यावेळी त्यांची कशी तारेवरची कसरत होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.