‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स सुरु आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. यावर अक्षरासुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अक्षरा-अधिपती यांच्यात अबोला आहे आणि हा अबोला कमी होण्याऐवजी आणखीच वाढताना दिसत आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट म्हणजे मालिकेत एक नवीन कलाकाराची एन्ट्री होणार आहे. या नवीन कलाकाराच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. (tula shikvin changlach dhada serial update)
अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जातो. तर, अक्षरा आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी पुन्हा सूर्यवंशींच्या घरी जाते. याठिकाणी भुवनेश्वरीशी तिचा मोठा वाद होतो. तर, दुसरीकडे अक्षराची बहीण इरा अधिपतीचे कान भरते. यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार आहे. “अक्षराचा मित्र परदेशातून आला आहे आणि ताई त्यालाच भेटायला गेली आहे” असं इरा अधिपतीला सांगते. हे ऐकताच अधिपती अस्वस्थ होतो आणि तो घरातून निघून जातो. अशातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, यातून अक्षराच्या या नवीन मित्राची झलक पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अक्षराला एक कॉल येतो त्यावर अक्ष अक्ष असं बोललं जातं आणि यावर अक्षरा कोण आहे असं म्हणते. यावर समोरून तिला अक्ष कोण म्हणायचं असं म्हटलं जातं त्यावर अक्षराही मॅक असं म्हणत तिच्या मित्राला ओळखते. यानंतर त्यांची भेट होते. तेव्हा तो अक्षराला कशी आहेस तू असं म्हणतो. यावर अक्षरा ठीक आहे असं उत्तर देते. त्यानंतर वाटत नाही, तुझा नवरा चांगला आहे ना असं म्हणते. यापुढे तिला चक्कर येते आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते.
आणखी वाचा – रॅपर Emiway Bantai चं थाटामाटात लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, कोण आहे त्याची पत्नी?
अक्षराने मॅकच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतानाच तिथे नेमका अधिपती येतो आणि त्या दोघांना एकत्र बघून अधिपतीच्या मनात त्यांच्याविषयी गैरमसज निर्माण होतो. यामुळे अक्षरा आपली फसवणूक करत आहे या विचाराने अधिपतीचे डोळे पाणवतात. त्यामुळे आता आधीच बिनसलेल्या अक्षरा-अधिपतीच्या नात्यामध्ये आता तिच्या या नवीन मित्राच्या एएन्ट्रीनंतर आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका कोणतं नवीन वळण घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.