मनोरंजन उद्योगातून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गायक दर्शन रावल यांच्यानंतर आता प्रसिद्ध रॅपरएमिवे बंटाय (Emiway Bantai) नेही लग्न केले आहे. स्वत: रॅपरने चाहत्यांना त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. एमिवे एमिवे बंटाईचे हे फोटो ओयहुन पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्याच्या काही महिला चाहत्यांची मनंही तुटली आहेत. रॅपर एमिवे बंटाईचा नुकतंच लग्न सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रॅपरनेही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. (emiway bantai tie knot with swaalina)
रॅपर एमिवे बंटाईने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो फ्लोरल डिझाइन केलेल्या शेरवानीमध्ये दिसत आहे. रॅपरने सनग्लासेस लावून त्याची वधू स्वालिना हिच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. रॅपरने मरुन रंगाची शेरवाणी परिधान केलेली पाहायला मिळत आहे आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. हलका मेकअप आणि पारंपारिक दागिन्यांवर दोघांनी गॉगल घातले आहेत. त्यामुळे दोघेही या फोटोमध्ये एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.
आणखी वाचा – सैफ अली खानचा वैद्यकीय अहवाल समोर, आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार नाही? मोठा युटर्न
स्वालिना एक अभिनेत्री, व्यावसायिक मॉडेल आणि लोकप्रिय संगीत कलाकार आहे. तिचे खरे नाव हलिना कुचे आहे आणि तिचा जन्म १ जुलै १९९५ रोजी फिनलंडमध्ये झाला. स्वलिनाने बरेच म्युझिक व्हिडीओ केले आहेत. दोघांनी २०२३ मध्ये आलेल्या ‘कुडी’ या सुपरहिट गाण्यात एकत्र काम केले होते. त्या व्हिडिओतील रॅपर एमिवे बंटाई आणि स्वलिना यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. आता दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.
आणखी वाचा – ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल
त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून लोकांना सुखद धक्का बसला आहे आणि याबद्दल चाहते आनंदही व्यक्त करत आहेत. ज्याला रँप ऐकण्याची वा करण्याची आवड आहे त्यांना एमिवे बंटाय नक्कीच आवडत असेल. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही त्याचा चाहतावर्ग आहे. आजवर आपल्या अनेक रॅप गाण्यांनी त्याने चाहत्यांना तालावर नाचवलं आहे. त्याच्या गाण्याच्या चर्चा होत असतात. अशातच रॅपर आता त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.