मुंबईत सध्या ‘कोल्ड प्ले’ फिव्हर पाहायला मिळाला. जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टचे आयोजन नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये १८, १९ व २१ जानेवारी असे तीन दिवस करण्यात आलं होतं. ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसाठी देशभरातील हजारो संगीतप्रेमी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर नवी मुंबईत आले होते. यावेळी क्रिस मार्टिननं सगळ्याच संगीतप्रेमींचं मन जिंकलं. या सांगीतिक मैफिलीसाठी अवघ्या संगीतप्रेमींनी हजेरी लावली होती. या कोल्ड प्ले लाईव्ह कॉन्सर्टचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या कोल्ड प्ले लाईव्ह कॉन्सर्टबद्दल आणखी एक बातमी व्हायरल होत आहे ती म्हणजे कचऱ्याची. (Gautami Deshpande on Cold Play garbage)
कोल्ड प्ले कॉन्सर्टनंतर रविवारी पहाटेपर्यंत नऊ हजार किलो कचरा जमा झाला होता. याचबद्दल अभिनेत्री गौतमी देशपांडेने सोशल मीडियाद्वारे तिची नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपल्या अनेक फोटो व व्हिडीओसह काही सामाजिक विषयांवर भाष्य करत असते. अशातच तिने कोल्ड प्लेला झालेल्या कचऱ्याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि यानिमित्ताने तिने नाराजीही व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – रॅपर Emiway Bantai चं थाटामाटात लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, कोण आहे त्याची पत्नी?
गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘कोल्ड प्ले नंतर १०० टन कचरा जमा’ या शीर्षकाची बातमी शेअर केली आहे आणि त्यावर असं म्हटलं आहे की, “आपल्या कृतीचे परिणाम आपल्याला खरोखरच कळत नाहीत का? प्लास्टिक हा सध्या आपला मुख्य शत्रू आहे! जरा शहाणारखं वागूया का आपण?”. कोल्ड प्लेनिमित्ताने नवी मुंबईतील डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातून चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
आणखी वाचा – सैफ अली खानचा वैद्यकीय अहवाल समोर, आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार नाही? मोठा युटर्न
यावेळी देशभर आणि जगभरातून तब्बल ७५,००० चाहते उपस्थित होते. यावेळी कोल्ड प्लेच्या चाहत्यांनी डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात खूप कचरा केला होता. चाहत्यांनी रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कोल्ड ड्रिक्सचे कॅन, फूल आणि अन्य गोष्टी मोठ्या संख्येने रस्त्यांवर फेकल्या होत्या. त्यामुळे रविवारी पहाटेपर्यंत नऊ हजार किलो कचरा जमा झाला होता. याच