प्रसिद्ध, लोकप्रिय विनोदवीर सुनील पाल बेपत्ता असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. कामासाठी गेलेले सुनील कुठे आहेत?, कसे आहेत? याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नव्हती. शिवाय त्यांचा फोनदेखील बंद असल्याने कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. सुनील यांच्याबरोबर काहीही संपर्क होऊ शकत नसल्यामुळे त्यांची पत्नी सरिता पाल यांनी सांताक्रुझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी सुनील यांचा शोध लावला आहे आणि यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सुनील यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, त्यांचा सुनील यांच्याबरोबर खूप वेळ संपर्क होऊ शकला नाही. मात्र, आता पोलिसांना सुनील पाल सापडले आहेत.
सुनील पाल यांची पत्नी मुंबई पोलिसांच्या एका शोसाठी मुंबईबाहेर गेली होती. ०३ डिसेंबरला घरी परतणार असल्याचे सुनील पाल यांनी सांगितले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा फोनही बंद होता. सुनील यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ न शकल्याने सुनीलच्या पत्नीने पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला. ज्यामुळे सुनील पाल यांचा शोध लगेच लागला.
आणखी वाचा – “स्वतःची चिरफाड होऊनसुद्धा…”, ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली मावशी, भावुक व्हिडीओ व्हायरल
सांताक्रूझ पोलिसांनी सुनील पालचा यांचा शोध सुरू केला आणि त्यांच्या जवळच्या लोकांची चौकशी सुरू केली. यानंतर पोलिसांना सुनील पाल यांच्याशी संपर्क साधण्यात यश आले. सुनील पाल यांचा फोन खराब झाल्यामुळे त्यांचा पत्नीशी संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ते बुधवारी (४ डिसेंबर) मुंबईत परतणार असल्याचे सुनील पाल यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये, सुनील पाल यांनी कॉमेडी या संकल्पनेवर त्यांच्या स्पष्ट मतांमुळे लक्ष वेधून घेतलं. अशातच आता ते अचानक बेपत्ता झाल्याच्या बातमी त्यांच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी होती. मात्र आता चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण पोलिसाचा सुनील पाल यांच्याशी संपर्क झाला आहे आणि ते सुखरुप असल्याचेही कळत आहे.