मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी. उत्तम अभिनयशैली आणि मनमोकळा स्वभाव यामुळे या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी कलाविश्वात सक्रीय आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही ते चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. यासाठी त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. मात्र ट्रोलर्सना न जुमानता दोघेही त्यांची प्रत्येक अपडेट शेअर करतात. (Aishwarya and Avinash Narkar Wedding Anniversery)
अशातच आता सोशल मीडियावर त्यांनी नुकताच त्यांच्या लग्नाच्या २९ व्या वाढदिवसाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांनी मिळून त्यांचा लग्नाचा २९ वा वाढदिवस साजरा केला आणि याचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऐश्वर्या यांनी खास व्हिडीओ शेअर करत “कालचा दिवस खूप मोठा होता… आम्ही आमची २९ वर्षे एकत्र साजरी केली आणि अजूनही खूप वर्षे पूर्ण करायची आहेत”. असं म्हटलं. तसंच पुढे त्यांनी अविनाश नारकरांना “माझ्याबरोबर कायम तुमचा पाठिंबा व प्रेम राहुद्या. तुम्हाला खूप खूप प्रेम” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – “स्वतःची चिरफाड होऊनसुद्धा…”, ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली मावशी, भावुक व्हिडीओ व्हायरल
३ डिसेंबर १९९५ मध्ये ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या जोडीने लग्नगाठ बांधली. नुकतीच त्यांच्या लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला आहे. या जोडीने घरच्या घरी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी ऐश्वर्या यांनी खास साडीही परिधान केली होती. विशेष म्हणजे लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या प्रेमातील गोडवा टिकून असल्याचे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.
आणखी वाचा – २४ तासांपासून बेपत्ता सुनील पाल अखेर सापडले, पोलिसांनी दिली माहिती, नक्की कुठे गायब होते?
मराठी मालिका, चित्रपट व रंगभूमी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. दोघेही गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. दोघांचाही फिटनेस आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या-अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात. गेली २९ वर्षे दोघांनीही एकमेकांना खंबीरपणे साथ दिली आहे आणि त्यांची ही साथ अजूनही कायम आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे