‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. मालिकेत गेले काही दिवस अनेक ट्विस्ट येत होते. अशातच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे अधिपती-अक्षरा यांच्या हनिमूनचा. यासाठी मालिकेची संपूर्ण टीम परदेशात गेली होती.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली होती. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली होती. या ट्रीपची खास झलक निर्माती शर्मिष्ठा राऊतने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली होती. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता हे कलाकार थायलंडवरुन परतले आहेत. थायलंडवरुन परतल्यानंतर अधिपती-अक्षरा यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला.
आणखी वाचा – खाण्यावरुनही निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांना टोकलं, जोरजोरात ओरडू लागली अन्…; इतर सदस्य गप्प का?
‘इट्स मज्जा’ बरोबर साधलेल्या संवादात अधिपती-अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे व हृषिकेश शेलार यांनी त्यांच्या थायलंडमध्ये केलेल्या मज्जा-मस्तीचे खास अनुभव शेअर केले. थायलंडमधील पर्यटनस्थळे जितकी लोकप्रिय आहेत. तितकीच तिथली खाद्यपद्धती ही चर्चेचा विषय आहे. थायलंडमधील लोक अनेक प्रकारच्या प्राण्यांपासून बनवलेले पदार्थ खातात. त्यामुळे शिवानी व हृषिकेश यांनीही तिथे काही अशा पदार्थांचा आस्वाद घेतला का? याबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत शिवानी व हृषिकेश यांनी थायलंडमधील स्पेशल पदार्थांचा उल्लेख केला.
यावेळी हृषिकेशने असं म्हटलं की, “या ट्रीपमध्ये मी मॅंगो स्टिकी राईस खाल्ला. तसंच मी मगर खाण्याचा विचार केला.पण माझं धारिष्ट्य काही झालं नाही. पण आमच्या टीममधील काही लोकांनी खाल्लं आणि त्यांना ते पचंलं
. पण मी मागे एकदा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा बेडूक खाल्ला होता. वेगळं असा पदार्थ म्हणजे तोच होता”. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या त्यांच्या हनिमून स्पेशल भाग पाहायला मिळत असून या भागांना प्रेक्षकांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.