बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अमेरिकेमध्ये बेडूक खाल्ला अन्…”, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “इतरांनी मगर खात…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 31, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada fame Adhipati Actor Hrishikesh Shelar shared the story of eating a frog during his trip to America

"अमेरिकेमध्ये बेडूक खाल्ला अन्...", 'तुला शिकवीन...'मधील अधिपतीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, "इतरांनी मगर खात..."

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. मालिकेत गेले काही दिवस अनेक ट्विस्ट येत होते. अशातच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे अधिपती-अक्षरा यांच्या हनिमूनचा. यासाठी मालिकेची संपूर्ण टीम परदेशात गेली होती.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली होती. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली होती. या ट्रीपची खास झलक निर्माती शर्मिष्ठा राऊतने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली होती. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता हे  कलाकार थायलंडवरुन परतले आहेत. थायलंडवरुन परतल्यानंतर अधिपती-अक्षरा यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला.

आणखी वाचा – खाण्यावरुनही निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांना टोकलं, जोरजोरात ओरडू लागली अन्…; इतर सदस्य गप्प का?

‘इट्स मज्जा’ बरोबर साधलेल्या संवादात अधिपती-अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे व हृषिकेश शेलार यांनी त्यांच्या थायलंडमध्ये केलेल्या मज्जा-मस्तीचे खास अनुभव शेअर केले. थायलंडमधील पर्यटनस्थळे जितकी लोकप्रिय आहेत. तितकीच तिथली खाद्यपद्धती ही चर्चेचा विषय आहे. थायलंडमधील लोक अनेक प्रकारच्या प्राण्यांपासून बनवलेले पदार्थ खातात. त्यामुळे शिवानी व हृषिकेश यांनीही तिथे काही अशा पदार्थांचा आस्वाद घेतला का? याबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत शिवानी व हृषिकेश यांनी थायलंडमधील स्पेशल पदार्थांचा उल्लेख केला.

आणखी वाचा – “बाकीचे तोंड बंद करुन बसले आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या बाजूने न बोलणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “त्यांना रडताना…”

यावेळी हृषिकेशने असं म्हटलं की, “या ट्रीपमध्ये मी मॅंगो स्टिकी राईस खाल्ला. तसंच मी मगर खाण्याचा विचार केला.पण माझं धारिष्ट्य काही झालं नाही. पण आमच्या टीममधील काही लोकांनी खाल्लं आणि त्यांना ते पचंलं

. पण मी मागे एकदा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा बेडूक खाल्ला होता. वेगळं असा पदार्थ म्हणजे तोच होता”.  दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या त्यांच्या हनिमून स्पेशल भाग पाहायला मिळत असून या भागांना प्रेक्षकांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.    

Tags: hrishikesh shelarmarathi entertainment newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
kriti sanon smoking video

सिगारेट ओढताना दिसली क्रिती सेनॉन, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, "हिचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.