शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं फाटलेलं धोतर बघून सगळेच हसू लागले अन्…”, ‘तुला शिकवीन…’च्या अधिपतीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “स्टेजवर एन्ट्री करताच…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada fame adhipati actor Hrishikesh Shelar shared his childhood story

"माझं फाटलेलं धोतर बघून सगळेच हसू लागले अन्...", 'तुला शिकवीन...'च्या अधिपतीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाला, "स्टेजवर एन्ट्री करताच..."

बालपणी प्रत्येकजण काही ना काही खोड्या करत असतो. बालपण हे खोड्या करण्यासाठीच असतं. लहानपणी केलेल्या खोड्या आता आठवून प्रत्येक जण त्या आठवणीत रमतो आणि बालपणीच्या त्या आठवणी आठवून आता प्रत्येकालाच हसायला येते. प्रत्येक जण बालपणी अतरंगी असतो आणि असाच एक अभिनेता आहे ज्याने त्याच्या लहानपणी अनेक खोड्या केल्या आहेत, हा अभिनेता म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अधिपती म्हणजेच हृषीकेश शेलार.

झी मराठीवर लवकरच ड्रामा ज्युनिअर्स हा नवीन कार्यक्रम सुरु होणार आहे. यामध्ये लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहता येणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने हृषीकेशने त्याच्या लहानपणीच्या काही खास किस्से सांगितले आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याने त्याच्या स्वामी विवेकानंदाच्या फॅन्सी ड्रेसबद्दल व त्याने साकारलेल्या एका विदूषकाच्या पात्राबद्दलची खास आठवण सांगितली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या व्हिडीओमध्ये हृषीकेशने असं म्हटलं आहे की, “मी तिसरी-चौथीत असताना आमच्या इथे गणेशोत्सवादरम्यान फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात मी स्वामी विवेकानंद झालो होतो. यासाठी मी भगवी वस्त्रे परिधान केली होती आणि यामुळे माझ्या मित्रांनी माझे खूपच कौतुक केलं. त्यामुळे मी खूपच हवेत गेलो. पण या नादात मी माझं भाषण पाठ करायचो विसरलो होतो आणि मी मोठ्या आत्मविश्वासाने स्टेजवर गेलो आणि माझ्या लक्षात आलं की मला काहीच येत नाहीये आणि मी जीभ बाहेर काढली. तसाच एक फोटो माझ्याकडे आहे”.    

आणखी वाचा – “तुम्ही अति करता असं वाटत नाही का?”, व्हिडीओवर कमेंट करणाऱ्याला क्रांती रेडकरचं उत्तर, म्हणाली…

यापुढे त्याने  दूसरा किस्साही सांगितला. याबद्दल त्याने असं म्हटलं की “मी आताच २०१४ मध्ये एका नाटकात भाग घेतला होता. त्यात मी विदूषकाची भूमिका साकारली होतो. त्यात मी धोतर परिधान केलं होतं आणि मोठं खोटं पोटही लावलं होतं. तर मी स्टेजवर एंट्री केली आणि सगळेच माझ्यावर हसायला लागले. मला वाटलं माझ्या एंट्रीनेच सगळे खुश झाले आहेत, पण खरंतर माझ्या फटलेल्या धोतरामुळे मला सर्व हसत होते. कारण मी घातलेलं धोतर हे बांधलेलं नव्हतं तर शिवलेलं होतं आणि ते मधूनच फाटलेलं होतं. आणि याचा एक फोटोही माझ्याकडे आहे”

आणखी वाचा – घटस्फोटानंतर केलं दुसरं लग्न, वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याने फक्त प्रसिद्धीसाठी…”

दरम्यान, हृषीकेशचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना आवडला असून या व्हिडीओ ला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी अभिनेत्याचे हे किस्से त्यांना आवडल्याचे कमेंट्सद्वारे म्हटलं आहे.        

Tags: hrishikesh shelarmarathi actormarathi entertainment newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Paaru Serial Update

पारूच्या वटपौर्णिमेच्या उपवासात दिशा-दामिनी आणणार का अडथळा?, सुखरुपपणे ती करु शकेल का वडाची पूजा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.