गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर केलं दुसरं लग्न, वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याने फक्त प्रसिद्धीसाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Dalljiet Kaur accused Nikhil Patel of using her name for a fame and seeking publicity know more

घटस्फोटानंतर केलं दुसरं लग्न, वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याने फक्त प्रसिद्धीसाठी...”

गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हे सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. लग्नाच्या ८ महिन्यांनंतरच दलजीत कौर पतीपासून विभक्त झाली आहे. २०२३ मध्ये दलजीत कौरने केनियातील उद्योगपती निखिल पटेलबरोबर लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल रोज काहीना काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशातच आता दलजीत कौरने निखिल पटेलच्या नावाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दावा केला आहे की निखिलने भारतात त्याच्यासाठी एक पीआर ठेवला आहे. हा सर्वात मोठा विनोद असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे निखिलने सार्वजनिकरित्या तिच्या नावाचा वापर करु नये. तसेच त्याने स्वत:च्या फायद्यासाठी तिच्या नावाने प्रसिद्धी घेणे आणि लोकप्रियतेसाठी इतके हताश होणेदेखील थांबवले पाहिजे.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

आणखी वाचा – वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये टेबल पुसले, त्याच हॉटेलचा मालक आहे सुनील शेट्टी, अभिनेत्याने सांगितली त्याची संघर्ष कहाणी

दलजीतने त्याच्याविरुद्ध केनियाच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. दलजीत कौर केनियाहून परतली असून निखिल तिचे सामान बाहेर काढू शकत नाही. तिने केनियाच्या कोर्टाकडून त्यावर स्थगिती घेतली आहे. दलजीत कौरने काही दिवसांपूर्वी पती निखिल पटेलवर फसवणूक व विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र निखिल पटेलने दलजीत कौरचे हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.

आणखी वाचा – Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळदीमध्ये फक्त ५० लोकांना एन्ट्री, काय असणार खास?

दरम्यान, दलजीत कौर व निखिल पटेल यांच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. तिच्या दुस-या लग्नानंतर दलजीत केनियाला गेली. पण ती आता भारतात परतल्यानंतर तिच्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी दलजीतचा अभिनेता शालीन भानौतबरोबर घटस्फोट झाला आहे. 

Tags: bollywood newsdalljiet kaurDalljiet Kaur Nikhil Patel MarriageNikhil patel
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
chiranjeevi son in law death

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे धक्कादायक निधन, अवघ्या ३९ व्या वर्षी गमावला जीव कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.