सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारूच्या वटपौर्णिमेच्या उपवासात दिशा-दामिनी आणणार का अडथळा?, सुखरुपपणे ती करु शकेल का वडाची पूजा?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 20, 2024 | 9:25 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

पारूच्या वटपौर्णिमेच्या उपवासात दिशा-दामिनी आणणार का अडथळा?, सुखरुपपणे ती करु शकेल का वडाची पूजा?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी देवाचे दर्शन घेऊन सावित्री व दिशाला प्रसाद देतात आणि दिशाला सांगतात की, पुढच्या वर्षी तुला सुद्धा वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. तर इकडे हरीश गावात झालेल्या कॅम्पेनचे फोटो घेऊन आलेला असतो त्या वेळेला त्या फोटोमध्ये प्रीतमला गावाकडच्या मास्तरीन बाईंचा फोटो मिळतो. तो पाहून प्रीतम खूप खुश होतो आणि सांगतो की, माझं यांच्यावर एकतर्फी प्रेम आहे. मला यांचं नावही माहिती नाही, तरीसुद्धा मी यांच्या प्रेमात पडलो आहे. जर माझ्या नशिबात या असतील तर त्या कुठून ना कुठून माझ्यासमोर येतील. तर हे पारू सुद्धा ऐकते. (Paaru Serial Update)

पारू त्यांना दिशा बरोबर तुमचा साखरपुडा झाला आहे, यावरून बरंच काही ऐकवते. मात्र प्रीतम त्यांचे काहीच ऐकून घेत नाही. त्यानंतर पारू हरीशच्या हातात ज्यूस देते. तो ज्यूस पाहून हरीशला काहीतरी आठवू लागतं. त्यावर हरीश सांगतो की, अस ज्यूस प्यायल्यावर मी बेशुद्ध झालो. त्या ज्यूसमध्ये काहीतरी कोणीतरी मिसळलं होतं पण तो ज्यूस कोणी आणून दिला आहे हे हरीशला आठवत नसतं. तर इकडे दामिनीला तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टीला जायचं असतं आणि मोहनकडून ती त्याची परवानगी सुद्धा घेत असते तितक्यात अहिल्या देवी येतात आणि अहिल्यादेवी सांगतात की, दामिनी तुला वटपौर्णिमेचा उपवास करावाच लागेल. आणि इथे फक्त अहिल्यादेवींचा शब्द चालतो त्यामुळे तुला किर्लोस्करांची प्रथम मोडून चालणार नाही.

आणखी वाचा – “माझं फाटलेलं धोतर बघून सगळेच हसू लागले अन्…”, ‘तुला शिकवीन…’च्या अधिपतीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “स्टेजवर एन्ट्री करताच…”

त्यानंतर पारू तिच्या जास्वंदाच्या झाडाबरोबर बोलत असते तेव्हा ती म्हणते की, मला काही करुन वटपौर्णिमेचा उपवास धरावाच लागेल. आदित्य सरांच्या दीर्घायुष्यासाठी मला हे करणं भाग आहे. हो मी सगळ्यांची फसवणूक करत आहे, हरीश सरांचीही या लग्नामुळे फसवणूक होणार आहे आणि हे मला पटत नाही आहे. फसवणुकीबद्दल दिशा व दामिनी ऐकतात आणि विचारतात की, तू कोणत्या फसवणुकीबद्दल बोलत आहेस. यावर पारू जराशी गोंधळते. तितक्यात दामिनी म्हणते की, त्या ऍडशूटसाठी हरीश ऐवजी आदित्य बसला त्यामुळे हरीशची फसवणूक केली आहे, असं तुला म्हणायचं आहे का?, यावर पारी पारू लगेच होकार देते. तेव्हा दिशा दामिनीवर चिडते आणि म्हणते की, तिला बोलू दे ना, तू कशाला सगळं काही सांगतेस आणि असं म्हणून तिथून निघून जाते.

आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे गुरुवारचा दिवस खूपच खास, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…

आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्यला अचानक पुन्हा बरं वाटत नसतं त्यावेळेला पारू आदित्य जवळ येते आणि मनात म्हणते की, मी नुसता उपवास धरायचा की नाही याचा विचार करत बसले तर आदित्य सरांची तब्येत अचानक खालावली म्हणजे मला काही करुन हा उपवास धरायलाच हवा. आता पारूच्या उपवासात काही अडथळे येणार का?, उपवासाचं सत्य सगळ्यांसमोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Deepika Padukone Troll

दीपिका पदुकोणने फ्लॉन्ट केला बेबी बंप, मात्र त्या गोष्टीवरुन नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “गरोदरपणात…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.