शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changalach Dhada : भुवनेश्वरीच चारुलता असल्याचे सत्य अक्षरासमोर येणार, ‘त्या’ कृतीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं, नवं वळण

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 6, 2024 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changalach Dhada serial updates Akshara realizes that Charulata is Bhuvaneshwari new promo viral

Tula Shikvin Changalach Dhada मालिकेत चारुलताच भुवनेश्वरी असल्याचे सत्य अक्षरासमोर येणार, नवीन प्रोमो पाहिलात का?

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changalach Dhada) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अधिपती व अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील कलाकारांचा अभिनय व मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांना ही मालिका भावते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलताची एन्ट्री झाली.  अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)

मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अक्षरा चारुलता व चारुहास यांचे पुन्हा लग्न लावण्याचे प्रयत्न करतानाचे पाहायला मिळत आहे. अशातच बाजारात गेलेल्या अक्षराला भुवनेश्वरीची पाठमोरी झलक दिसली. यावेळी अक्षराचे लक्ष भुवनेश्वरीच्या कानातल्यांवर गेलं होतं. तेव्हापासून तिला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यात अक्षराच्या मनात संभ्रम तयार झाला होता. अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अक्षराला भुवनेश्वरीच्या कानात दिसलेले कानातले चारुलताच्या कानात दिसले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Appi Amchi Collector : अमोलकडे आता फक्त दोन महिने शिल्लक, या काळात आई-बाबांबरोबर घालवणार वेळ, भावुक प्रोमो समोर

गेल्या अनेक दिवसांपासून भुवनेश्वरीच सूर्यवंशींच्या घरी चारुलता होऊन वावरत आहे. अशातच अक्षराने भुवनेश्वरीला बाजारात पाहिल्यामुळे तिची शंका खरी ठरली आहे आणि ती या घडल्या प्रकाराबद्दल अधिपतीला सांगते. तसेच भुवनेश्वरीच खोटी चारुलता म्हणून वावरत असल्याने काही करून त्यांचं बाबांबरोबर लग्न होता कामा नये. आपण हे लग्न थांबवलं पाहिजे असंही अक्षरा अधिपतीला सांगते. त्यामुळे एकीकडे भुवनेश्वरी चारुलता म्हणून त्यांच्या लग्नाविषयी चारुहासला म्हणते की आपण आपलं लग्न अलीकडे घेऊयात तर अक्षरा त्यांचे लग्न मोडण्याचा विचार करत आहे.

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi : केदारच्या गायब असण्यामागे होता शेखरचा हात, केदारचे त्याच्यावर गंभीर आरोप, राजाध्यक्ष विश्वास ठेवणार का?

त्यामुळे चारुलता आणि चारुहासचं लग्न अक्षरा थांबवू शकेल का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसंच चारुलताचे सत्य आता अक्षरा सर्वांसमोर आणणार का? यात तिला अधिपतीची साथ मिळणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आगामी भगांसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.  

Tags: Tula shikvin Changalach DhadaTula Shikvin Changalach Dhada Marathi SerialTula Shikvin Changalach Dhada Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Next Post
Vaibhav Chavan And Irina Rudakova

"बारामतीची सून", वैभव चव्हाणसह इरिनाचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "फॉरेनची पाटलीण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.