Appi Amchi Collector Marathi Serial : झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन वळण येत आहेत. मालिकेत अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी अमोल प्रयत्न करत होता आणि त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून नुकतंच मालिकेत अप्पी व अर्जुन अमोलसाठी एकत्र आले. अर्जुनने अप्पी आणि अमोलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेत काही दिवस अमोल दोघांना एकत्र आणत होता आणि अमोलला यश मिळाले आहे. अप्पी-अर्जुन दोघे अमोलसाठी एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहून प्रेक्षकही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. (Appi Amchi Collector Serial Updates)
मालिकेत आनंदी वातावरण असताना मीठाचा खडा पडला तो म्हणजे अमोलच्या आजारपणाचा. अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र आले आहेत. पण त्यांना एकत्र आणणारा अमोल आजारी पडला आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला आजार झाल्याचे समोर आले होते. मात्र हा आजार नक्की काय होता? याविषयी कुणालाच काहीच कल्पना नव्हती. अमोलने त्याच्या आजारपणाचे कारण सर्वांपासून लपवलं होतं. मात्र फिरायला अमोल, अप्पी व अर्जुन फिरायला गेले असताना तो चक्कर येऊन पडतो. तेव्हा अर्जुन त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो.
अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अमोलच्या आजाराचे नेमके कारण समोर आले आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये डॉक्टर अमोलला मेडीमोप्लास्टो नावाचा आजार झाल्याचे सांगत त्याच्या मेंदूत गाठ झाली आहे असं म्हणतात. यानंतर अमोल त्याच्या बाबांना माझ्याकडे अजून किती दिवस बाकी आहेत असं म्हणतो. यावर अमोल त्याला दोन महीने असं म्हणतो. मात्र यावर लहान अमोल अजिबात हताश न होता असं म्हणतो की, “अजून भरपूर दिवस आहेत. आपण या दोन महिन्यांमध्ये पूर्ण आयुष्य जगू आणि एकमेकांबरोबर खास क्षण घालवू”.
मालिकेचा हा नवीन प्रोमो सर्वांनाच भावुक करणारा आहे. अमोलच्या या बोलण्यानंतर अप्पी व अर्जुन यांना अश्रू अनावर होतात. त्यानंतर दोघे अमोलला घट्ट मिठी मारतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकही हळहळले आहेत. “अमोलला बरं करा”, “मालिकेचा हा नवीन प्रोमो खूपच भावुक आहे”, “अशी कथा बघून खऱ्या भावना समोर येतात” अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.