Vaibhav Chavan And Irina Rudakova : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर या पर्वातील सर्वच सदस्यही चर्चेत राहिले. ‘बिग बॉस मराठी’ संपलं असलं तरी या पर्वातील सगळेच सदस्य एकमेकांना भेटताना दिसत आहेत. या पर्वात स्पर्धकांच्या अनेक नाती जुळताना पाहायला मिळाल्या. या पर्वातील एक चर्चेत असलेलं नातं म्हणजे वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा यांची मैत्री. ‘बिग बॉस’च्या घरातील वैभव व इरिना यांची मैत्री अनेकांच्या पसंतीस पडली. सुरुवातीला त्यांच्यात प्रेमाचे बंध फुलतायत की काय असं वाटत होतं मात्र वैभवने त्यांच्यामध्ये निखळ मैत्री असल्याचं सांगितलं.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही अनेकदा इरिना व वैभव एकत्र स्पॉट झाले होते. सर्वात आधी इरिना व वैभवने कोल्हापूर गाठत डीपीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीत जाऊन सूरज चव्हाणचीही भेट घेतली. सोशल मीडियावरही एकत्र व्हिडीओ पोस्ट करत ही जोडी दिसते. वैभव इरिनाला त्याच्या गावाकडे फिरवताना दिसतोय. अलीकडेच हे दोघे जिम सेशनही एकत्र करताना दिसले. एका रोमँटिक गाण्यावर त्यांचा जिममधील व्हिडीओ पाहून चाहत्यांच्याही मजेशीर कमेंट आल्या आहेत.
इरिनाने बारामती याठिकाणी असणाऱ्या जिममधून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘देखो ना देखो ना…’ या रोमँटिक गाण्यावर ट्रेडिंग डान्स स्टेप करत तिने हा व्हिडीओ शेअर केला. शिवाय ‘देखो ना देखो ना…’ असे कॅप्शन देत, बारामतीमधील संबंधित जिममध्ये कपल ऑफर चालू असल्याचेही ती म्हणाली आहे. दोघेही या व्हिडीओमध्ये जिम करता करता ठेका धरताना दिसत आहेत. . सोशल मीडियावर इरिना-वैभवचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
“बारामतीची सून, मस्त जोडी”, “‘हे दोघेजण निक्की व अरबाज यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगले आहेत”, “यंदा उरकून टाका”, “बारामतीचे २ चव्हाण ‘बिग बॉस’मध्ये सर्वांवर भारी पडले, दोन ट्रॉफी बारामतीला दिल्या”, “फॉरेनची पाटलीण २”, अशा अनेक कमेंट करत त्यांनी दोघांचंही कौतुक केलं आहे. एकंदरीत नेटकऱ्यांनी त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे.