शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changalach Dhada : अधिपतीकडून चारुलताचा आई म्हणून स्वीकार, अक्षराची परिस्थिती अजूनही वाईट, नवं वळण

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changalach Dhada mararhi serial update new twist that Adhipati has accepted Charulata as her mother

तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवा ट्विस्ट, अधिपतीने चारुलताचा आई म्हणून केला स्वीकार

भुवनेश्वरीचा दरारा, अधिपतीचे आईप्रति आणि अक्षराचे कुटुंबाप्रति असलेले प्रेम तसंच अधिपती व अक्षरा यांच्यामधले दिलखुलास नाते, त्याचबरोबर चारुहास-अधिपती या बापलेकामधील गैरसमज अशा अनेक कारणांमुळे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक मालिका झाली आहे. काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलताच्या एन्ट्री नंतर मालिकेला एक नवीन वळण आलं आहे. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)

काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर अक्षराला चारुलता सापडते. त्यांच्यात सर्व काही आलबेल सुरु असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येतो तो म्हणजे अक्षराला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजते. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

गेले काही दिवस अधिपतीने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यासाठी अक्षरा प्रयत्न करताना दिसत होती. पण अधिपती काही केल्या चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. पण आता तो चारुलताला आईसाहेब म्हणून साद देणार आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – Video : भर मुलाखतीत मुकेश खन्ना भडकले, उपस्थितांना नको नको ते बोलले अन्…; नेटकरी म्हणाले, “जया बच्चनसारखे…”

या नवीन प्रोमोमध्ये अक्षराला अधिपतीला समजावत आहे. “तुम्ही वेळीच जागे व्हा, तुमच्या डोळ्यात धूल फेकली जात आहे. हे सगळं खूप भयंकर आहे” असं अक्षरा अधिपतीला सांगते. त्यानंतर चारुलता येते आणि अधिपतीला असं म्हणते की, “हिला काय झालं आहे? ही अशी का वागत आहे?”. यानंतर अधिपती “काही झालं नाही” असं म्हणत चारुलताला आईसाहेब असं म्हणतो. यानंतर अक्षराच्या चेहऱ्यावरकहा रंगच उडतो. त्यामुळे आता चारुलताच्या जाळ्यात अधिपती अडकणार की काय? हे पहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – चित्रपटगृहांनंतर विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती एक्स्प्रेस’ आता ‘या’ ओटीटी माध्यमावर येणार, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

दरम्यान, मलिकेत इतके दिवस अधिपती व चारुलता यांच्यात थोडे तणावपूर्वक नाते होते. अधिपती चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. पण आता त्याने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारले की काय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच चारुलताच्या या जाळ्यात अडकलेल्या अधिपतीला अक्षरा कशी बाहेर काढणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.   

Tags: Tula Shikvin Changalach Dhada Marathi SerialTula Shikvin Changalach Dhada Marathi Serial UpdatesTula Shikvin Changalach Dhada Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
ranbir kapoor daughter raha photo viral

स्विमसूटमध्ये कॅमेऱ्यासमोर आली रणबीर कपूरची लेक, हेअरस्टाइलची रंगील सर्वाधिक चर्चा, क्युट फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.