बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूरचा जन्म झाल्यानंतरच मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी राहाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळाला. या फोटोमध्ये राहा गुलाबी रंगाच्या स्विमिंग सूटमध्ये बघायला मिळत आहे. तसेच तिने डोक्यावर पांढऱ्या रंगाची शॉवर कॅपदेखील घातली आहे. या लूकमध्ये राहा खूप गोड दिसत आहे. अशातच तिचा अजून एक फोटो सोशल मीडियावर दिसून येत आहे. यामध्ये रणबीर-राहा स्टाफबरोबरदेखील पोज देताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (ranbir kapoor daughter raha photo viral)
आलिया-रणबीरच्या लेकीचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल दिसून येतात. तिच्या नवीन फोटोला चाहत्यांनी खूप पसंतीदेखील मिळाली आहे. रणबीर व राहा यांच्या फोटोमध्ये त्यांचा चांगला बॉंडदेखील दिसून येत आहे. रणबीरने यावेळी पांढरा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅंट परिधान केली आहे. सर्वत्र या फोटोची चर्चा सुरु आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका एकाने लिहिले आहे की, “राहा किती गोड दिसत आहे?”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “ही किती गोड दिसत आहे”.
गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया व रणबीर यांना ईशा अंबानी व आनंद पिरामल यांची मुलगी आदियाबरोबर बघितलं गेलं. यावेळीदेखील राहा खूपच गोड दिसत होती. राहाच्या वाढदिवसाचीदेखील चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली होती. रणबीर कपूर व आलिया भट्ट ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आई-वडील झाले.
सुमारे एक वर्षानंतर, गेल्या ख्रिसमसला, त्यांनी त्याच्या चाहत्यांना आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली. यानंतर राहा जेव्हाही घराबाहेर पडली तेव्हा तिला पापाराझीच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. राहा कॅमेरा फ्रेंडली आहे आणि पापाराझींना पाहताना अनेकदा चेहऱ्याचे हावभाव बदलते. दरम्यान रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आता ‘रामायण’ या बहूचर्चित चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.