मुग्धा वैशंपायन छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. मुग्धाने आजवर तिच्या गायन कौशल्याने साऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गायनामुळे लोकप्रिय असलेली मुग्धा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली. मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘आमचं ठरलं’ असं म्हणत दोघांनी त्यांचा एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली. (Mugdha Vaishampayan New Look)
रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी समोर आल्यापासून मुग्धा व प्रथमेश विशेष चर्चेत आले आहेत. लवकरच मुग्धा व प्रथमेश विवाहबंधांत अडकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत. नुकतीच मुग्धाची ‘ब्राईड टू बी पार्टी’ पार पडली. मुग्धाने जवळच्या मित्र-मंडळींसह ‘ब्राईड टू बी’ पार्टी एन्जॉय केलेली पाहायला मिळाली. तिच्या या पार्टीतील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.
या ‘ब्राईड टू बी’ पार्टीनंतर लवकरच मुग्धा विवाहबंधनात अडकणार असल्याचं निश्चित झालं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच मुग्धाच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाआधी मुग्धाने स्वतःचा लूक बदलला आहे. मुग्धाने केलेल्या नव्या हेअरस्टाईलच्या लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत तिने नवी हेअरस्टाईल केली असून तिचा हा लूक लक्षवेधी ठरत आहे. मुग्धाने केलेला नवा हेअरकलर साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
यावरून लग्नाआधी मुग्धा तयारीला लागली असल्याचं कळतंय. नुकतंच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुल वैशंपायनचं लग्न झालं. मुग्धाच्या मोठ्या बहिणीच्या लग्नातील फोटोंनी, तसेच लग्नापुर्वीच्या विधींच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धाही स्वतःच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे.