‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमुळे अभिनेत्री तितीक्षा तावडेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे म्हणजे नेत्रा व अद्वैत या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. तर ऐश्वर्या नारकर यांच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकूणच या रहस्यमय अशा कथेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेमुळे नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा चर्चेत आली. तितीक्षाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Titeeksha Tawde and Siddharth Bodke Home)
सोशल मीडियावरही तितीक्षा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्य्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वी तितीक्षा तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नामुळे चर्चेत आली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. तितीक्षा व सिद्धार्थ यांनी अगदी शाही थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नानंतर तितीक्षा सिद्धार्थसह राहत असून तिच्या नव्या घराची झलक तिच्या एका व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
तितीक्षाने तिच्या युट्युब चॅनेलवरुन तिच्या माहेरच्या घराची झलक दाखविली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच लेक व जावई घरी आल्याने तितीक्षाच्या आई-बाबांनी दोघांचं अगदी जंगी स्वागत केलं. याशिवाय तितीक्षाने तिच्या रोजच्या जीवनक्रमाविषयी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तितीक्षा सध्या राहत असलेल्या घराची झलक पाहायला मिळाली.
या व्हिडीओमध्ये तितीक्षाच घर पाहायला मिळालं असून ते अगदी नीटनेटकं आहे. तितीक्षाने तिचं घर सजवलं असून अगदी सुटसुटीत ठेवलं आहे. विठ्ठल-रुक्मिणीची मूर्तीही त्यांच्या लिव्हींगरुममध्ये दिसत आहे. तर त्याशेजारी दोघांची फोटोफ्रेम पाहायला मिळत आहे. शिवाय लिव्हिंग रुममधील लॅम्पने लक्ष वेधलं आहे. चप्पल ठेवण्यासाठी त्यांनी खास खणही तयार करुन घेतला आहे. याशिवाय अत्यंत साधं असं किचन ही पाहायला मिळालं. किचनमधील पाण्याच्या माठाने साऱ्यांचं लक्ष वेधलं. आजकाल फार कमी घरांमध्ये माठ पाहायला मिळतं.