हल्ली सोशल मीडियावर अनेक कलाकरांकडून एखादं गाणं, डान्स किंवा ट्रेंड लगेच फॉलो केला जातो. सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकार आपल्या चाहत्यांबरोबर विविध ट्रेंड फॉलो करत असतात. असाच एक ट्रेंड फॉलो केला आहे ‘पारू’ मालिकेमधील कलाकरांनी. सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा-२’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘अंगारो सा सामी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे आणि या गाण्यावर अनेकजण डान्स व्हिडीओ करत आहेत.
अशातच ‘पारू’मधील पारू, आदित्य व दिशा म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे, पूर्वा शिंदे व अभिनेता प्रसाद जवादे यांनी या सध्या गाजत असलेल्या गाण्यावर हटके डान्स व्हिडीओ केला आहे. मालिकेच्या सेटवरच या कलाकारांनी ‘पुष्पा-२’मधील ‘अंगारो सा’ या गाण्यावर हटके डान्स व्हिडीओ केला आहे. ‘पारू’ मालिकेचे शुटींग हे सध्या सातारामध्ये सुरू असून या मालिकेचा सेट हा भव्यदिव्य आहे. या सेटवर किर्लोस्करांच्या घरासमोर मोठी बाग आहे आणि बागेतच शरयू, पूर्वा व प्रसाद यांनी हा डान्स केला आहे.
‘पुष्पा-२’मधील ‘अंगारो सा सामी’ या लोकप्रिय गाण्यात दाक्षिणात्य व बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या गाण्यात या दोघांचा भन्नाट डान्स पाहायला मिळत असून सध्या सोशल मीडियावर या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच या गाण्यावर ‘पारू’ मालिकेच्या कालाकरांनीही डान्स केला आहे. “पुष्पा इन पारू स्टाईल” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
शरयू, पूर्वा व प्रसाद यांच्या या हटके गाण्याच्या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे खूपच चांगला प्रतिसाद दिल्याचा पाहायला मिळत आहे. तसेच मालिकेतील इतर कालाकरांनीही या व्हिडिओला कमेंट्सद्वारे दाद दिली आहे. या व्हिडीओखाली प्रसादची बायको अमृता देशमुख हिनेदेखील कमेंट केली असून तिची कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.