लोकप्रिय मराठी दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनेक हिट चित्रपटात काम करत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. मांजरेकरांचा मुलगाही या क्षेत्रात सक्रिय आहे.
सत्या मांजरेकरने ‘एफ.यू.’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ‘पोर बाजार’, जाणिवा’सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता त्याच्या सोशल मीडियाद्वारेही चांगलाच चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सत्या मांजरेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून त्याचा बदलता लूक पाहायला मिळत आहे. सत्याने त्याचा जिममधील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये सत्या जिममध्ये कसरत करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सत्या डंबेल्सने व्यायाम करताना दिसत आहे. तसेच यासाठी तो अतिशय मेहनत घेत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
सत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओवर सत्याचे वडील म्हणजेच महेश मांजरेकर यांनीही कमेंट करत लेकाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, सत्या सध्या अभिनयाबरोबरच ‘सुका सुकी’ या हॉटेलचे कामकाजही बघतो. तो लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे आणि सत्या याच चित्रपटाची तयारी करत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.