बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Pankaj Udhas Death : गझल पोरकी झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, वयाच्या ७२व्या वर्षी जगाचा निरोप

काजल डांगेby काजल डांगे
फेब्रुवारी 26, 2024 | 4:32 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Music Legend Pankaj Udhas Death News in Marathi

गझल गायक पंकज उधास यांचे ७२ व्या वर्षी निधन

Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेली कित्येक वर्ष आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. पंकज यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृतरित्या देण्यात आली आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. पंकज उधास यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. (Pankaj Udhas Death News)

पंकज यांची मुलगी नायाब उधासने वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली. तिने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असं नमुद केलं आहे की, “आम्हाला हे सांगण्यात खूप दुःख होत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचं २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते”. पंकज यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

आणखी वाचा – नवी ‘रामायण’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, प्रेम सागर यांची मोठी घोषणा, म्हणाले, “रामाच्या शोधात आहोत कारण…”

‘आजतक’च्या वृत्तानुसार पंकज यांना पीआर टीमने सांगितलं की, मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सकाळी ११.०० वाजता पंकज यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून आजाराशी ते झुंज देत होते. काही दिवसांपासून त्यांची तब्येत आणखीनच खालावली होती. पंकज यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर संगीत विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवनही हादरुन गेले आहेत. संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं असल्याचं शंकर महादेवन यांचं म्हणणं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)

संगीत विश्वामध्ये पंकज यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जात होतं. ‘चिट्ठी आई है’ या गझलमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. १९८६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ चित्रपटामध्ये या गझलचा समावेश होता. ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘चले तो कट ही जाएगा’, ‘तेरे बिन’ सारख्या गझलला त्यांनी आवाज दिला. आज पंकज यांच्या निधनानंतर चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.  ्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअरकेल

Tags: bollywood newsentertainmententertainment newsits majja
काजल डांगे

काजल डांगे

काजल डांगे या 'इट्स मज्जा' वेबसाईटच्या सीनिअर एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. 'लोकसत्ता' ऑनलाईनमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून त्या दीड वर्ष कार्यरत होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding News in Marathi

तितीक्षा तावडेने जपली मराठमोळी परंपरा, अगदी साध्या पद्धतीच्या मंगळसूत्राला दिली पसंती, डिझाइन आहे खूपच छान, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.