प्रथमेश परब व क्षितीजा घोसाळकरच्या लग्नानंतर पूजा सावंत, तितीक्षा तावडेच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे पूजा व सिद्धेश चव्हाणच्या संगीत सोहळ्याची चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे तितीक्षा व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच तितीक्षा व सिद्धार्थच्या साखरपुड्याचे फोटो त्यांनी स्वतःच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा होता. आता सिद्धार्थला तितीक्षाच्या नावाची हळद लागली आहे. त्यादरम्यानचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Titeeksha Tawade And Siddharth Bodke Wedding)
अभिनेत्री ऋतुजा बागवेने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सिद्धार्थच्या हळदीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सिद्धार्थने मुंडावळ्या बांधल्या आहेत. तसेच पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे. तसेच त्याचा संपूर्ण चेहरा हळदीने रंगला आहे. तर ऋतुजाने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये कलाकार मंडळी मिळून धमाल—स्ती करताना दिसत आहेत. फोटो तसेच काही व्हिडीओ पाहता निसर्गरम्य वातावरणामध्ये तितीक्षा व सिद्धार्थचं लग्न होणार असल्याचं कळून येतं. एका फॅनपेजद्वारे सिद्धार्थच्या हळदीमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेच्या हातावर रंगली सिद्धार्थ बोडकेच्या नावाची मेहंदी, नवरीबाईचा उत्साह, जय्यत तयारी अन्…
सिद्धार्थच्या एका फॅनपेजने हळदी समारंभातील खास व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ व त्याचे बाबा आनंदाने डान्स करताना दिसत आहे. त्याच्या बाबाच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. सिद्धार्थ व त्याच्या बाबांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच ऋतुजाबरोबर अनघा अतुल, रसिका सुनिलही तितीक्षा-सिद्धार्थच्या हळदी सोहळ्यामध्ये धमाल करताना दिसत आहेत.
तितीक्षा व सिद्धार्थने साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करत एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं की, “forever with my bestfriend”. मालिकांमध्ये एकत्र काम करत असतानाच तितीक्षा व सिद्धार्थमध्ये मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्य केलं नाही. तितीक्षा व सिद्धार्थने त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत लग्नाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.