सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब त्याच्या गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. तर एकीकडे लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींची धामधूम पाहायला मिळत आहे. संगीत, मेहंदीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच प्रेक्षकांची एक लाडकी लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आलं आहे. ही लाडकी जोडी म्हणजेच तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके. (Titeeksha Tawade And Siddharth Bodke Engagement Ceremony)
तितीक्षा व सिद्धांत यांच्या लग्नाची काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र ही जोडी नेमकी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच तितीक्षा व सिध्दार्थच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले. दोघांनी साखरपुडा करत एकमेकांबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. यानंतर साखरपुड्यादरम्यानचा एक खास स्पेशल व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर करत साऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडीओमध्ये साखरपुड्यासाठीचं खास डेकोरेशन साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. तर सिद्धार्थ त्याच्या या खास दिवसासाठी तयार होताना दिसत आहे. त्यानंतर दोघांचाही रोमँटिक अंदाज या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर दोघेही रिंग फ्लॉन्ट करतानाही दिसले आहेत. सिद्धार्थ व तितीक्षाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. त्यांच्या या स्पेशल व्हिडीओवर कलाकार मंडळी तसेच चाहत्यांनीही कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनघा अतुलची गंमत पाहायला मिळत आहे. अनघा व्हिडीओमध्ये, तावडे व बोडके परिवाराला जेवणाच्या पंक्तीला बसण्याचे आवाहन करत आहे.
साखरपुडानंतर लगेचच हळदी समारंभाचा कार्यक्रम उरकला असून दोघांच्या हळदी समारंभातील खास लूकही समोर आले आहेत. तसेच साखरपुड्यासाठी दोघांनी पारंपरिक व मॉडर्न टच असलेला लूक केलेला पाहायला मिळाला. यात तितीक्षाची डिझायनर साडी खास लक्षवेधी ठरली. तर सिद्धार्थ डिझायनर कुर्तामध्ये पाहायला मिळाला. अखेर साखरपुड्यानंतर हळदी समारंभासाठी ही दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. एकमेकांच्या नावाची हळद लागत त्यांचा हा हळदी कार्यक्रम थाटामाटात पार पडलेला पाहायला मिळाला. लवकरच आता ही जोडी लग्न बंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या फोटो व व्हिडिओकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.