‘टाइमपास’ चित्रपटातून प्राजूच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. तिने आपल्या साध्या, सोज्ज्वळ अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली. अभिनयाबरोबर केतकी एक उत्तम गायिका आहे. ती ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मध्ये ही दिसली होती. ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरु’ यांसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. केतकी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही तिने तिचा जीममधील वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ती बरीच ट्रोलही झाली आहे. (ketkaki mategaonkar trolled)
शेअर केलेल्या व्हिडीओत केतकी जीममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. तर तिला तिचा जीम ट्रेनर मार्गदर्शन करताना दिसतो आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत ती लिहीते, “या नवीन वर्षात, मी माझ्या शारीरिक व भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचं स्वतःला वचन देते. जीम व योगामुळे माझं आयुष्य खूप सुधारलं आहे. प्रत्येकवेळी आपण आपल्या भवितव्यासाठी पुढे पाऊल टाकतो. हीच गोष्ट आपल्या जीवनातील इतर प्रत्येक पैलूला अधिक छान बनवतो”.
ती पुढे लिहीते, “आपल्याकडे कामं आहेत. आपली ध्येय आहेत. पण आरोग्याला प्राधान्य देणं आणि दिवसाचे पहिले काही तास त्यासाठी देणं हे आपल्यासाठी बरंच चांगलं आहे.दिवसाचा एक तास शारीरिक आरोग्यासाठी व एक तास आपल्या मनासाठी, व दिवसाचा सुंदर विसावा घेण्यासाठी पुरेसा आहे. इच्छाशक्ती ही इंधनासारखी असते. ती संपू शकते! त्यामुळे प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्त ही आपल्याला प्रेरणेपेक्षा येश मिळवण्यासाठी मदत करते”, असं लिहीत तिने तिच्या वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होते आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवरून तिला व तिच्या जीम ट्रेनरला चांगलंच ट्रोल केलं आहे. एक नेटकरी लिहितो की, ‘ट्रेनरची बॉडी आणि शरीरयष्टी अशी का आहे’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘ट्रेनर आणि ट्रेनी या दोघांनाही लवकरात लवकर खाण्याची खूप गरज आहे’. तर आणखी एकाने केतकीला कमेंट करत ट्रोल केलं, ‘किती ही प्रयत्न करा काही उपयोग नाही. आधीच वजन कमी त्यात आहेस ती पण कमी होईल बाई’, असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.