बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वादाची ठिणगी! अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’मधून अनिल कपूर बाहेर, नाना पाटेकरांच्या भूमिकेवरही होणार परिणाम, भांडण की आणखी काही

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2024 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anil Kapoor Leaves Housefull 5

वादाची ठिणगी! अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५'मधून अनिल कपूर बाहेर, नाना पाटेकरांच्या भूमिकेवरही होणार परिणाम, भांडण की आणखी काही

‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अनिल कपूरने हा चित्रपट सोडल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळाला. अनिल कपूर व ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला यांच्याबरोबर चित्रपटाच्या मानधनावरुन वाद झाला होता. ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ या चित्रपटानंतर नाना पाटेकर व अनिल कपूर ही हिट जोडी ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसणार होती. चाहतेही या जोडीला पाहायला खूप उत्सुक होते. पण आता ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. (Anil Kapoor Leaves Housefull 5)

अभिनेता अनिल कपूर हा चित्रपट सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘हाऊसफुल ५’मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख व अभिषेक बच्चन यांच्याबरोबर नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनाही कास्ट करण्यात आले होते. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे समोर येताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हापासून चाहते मंडळी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या चित्रपटाबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे. ‘मिड डे’च्या वृत्तानुसार, साजिद नाडियादवाला व अनिल कपूर यांच्यात पैशांवरुन वाद झाल्याने त्याने हा चित्रपट सोडला आहे.

आणखी वाचा – इंद्राणीला रुपालीने केलं किडनॅप, तिच्याच रक्ताने नेत्राला पाठवलं पत्र, तन्मय फाशी घेत असताना अद्वैतने बघितलं अन्…; मृत्यूचा थरार

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

‘मिड डे’च्या वृत्तानुसार, अनिल कपूरने ‘हाऊसफुल ५’साठी मागितलेल्या मानधनामध्ये साजिद नाडियाडवाला सहमत नव्हते. यामुळे अनिलने चित्रपट सोडला आहे. त्यामुळे निर्माते नाना पाटेकर यांच्या व्यक्तिरेखेवर नव्याने काम करत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात त्यांची अनिल कपूरबरोबर केमिस्ट्री दाखवली जाणार असल्याने आता त्यांची व्यक्तिरेखा पुन्हा लिहिली जात असल्याचंही समोर आलं आहे. आता अनिल कपूरच्या भूमिकेसाठी अर्जुन रामपालबरोबर चर्चा सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

आणखी वाचा – पारू-आदित्यचा शाही लग्नसोहळा, पण समोर आलं वेगळंच सत्य, गळ्यातील मंगळसूत्रावरुन पारूने घेतलेला निर्णय अहिल्यादेवींना पटणार का?

‘हाऊसफुल ५’ चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्टपासून यूके येथे सुरु होणार आहे. २०२५मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

Tags: anil kapoorAnil Kapoor Leaves Housefull 5bollywpod movieentertainmenthousefull 5nana patekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Marathi Actor Anand Ingale commented on trolling

"ज्यांची लायकी नाही त्यांनी…", ट्रोल करणाऱ्यांना आनंद इंगळेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले, "माझ्यावर त्यांनी का बोलावं?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.