‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारे अभिनेता म्हणजे अरुण कदम. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना लाडके दादूस म्हणून ओळखतो. त्यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांना आपलंस केलं. अरुण नेहमी त्यांच्या हटके अभिनयामुळे बरेच चर्चेत असतात. पण सध्या त्यांच्या नातवाच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच वाढल्या आहेत. अरुण कदम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या ते त्यांच्या नातवाबरोबरचे गोड क्षण शेअर करतात. आताही त्यांनी असाच एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (arun kadam sang special angai for his grandson)
शेअर केलेल्या व्हिडीओत अरुण त्यांच्या नातवाला झोपवण्यासाठी अंगाई गात आहेत. पण ही अंगाई पारंपारिक अंगाई नसून वारकऱ्यांची ओळख असलेला अभंग गायला. हा अभंग गाताना अरुण ठेका धरतानाही दिसले. नातवावर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने देवाची गाणी अरुण स्वतः गात आहेत. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हे बोल अथांग अगदी मन लावून ऐकताना दिसतो.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी लाईक, कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर अंदाजात कमेंट केली, ‘बाळ सांगत, बाबा हाताचा पाळणा मस्त वाटतोय. आता मी झोपणारच नाही’, असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘खूप मौल्यवान क्षण’, असं लिहीत कमेंट केली आहे.
यापूर्वीही अथांगचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. ज्यात सुकन्या त्याच्यासाठी गाणं गात असताना अथांग तिला पुढे स्वतःच्या अंदाजात प्रतिक्रिया देताना दिसला. त्याचबरोबर त्याचा आणखी एक बॉक्स भाईवाला व्हिडीओ तर सोशल मीडियावर बराच गाजला. या व्हिडीओत अरुण यांच्या नातवाने हातात ग्लोव्हस घालून दिसला होता. अथांगचे हे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.