शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानचा ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, ‘जवान’चाही मोडला रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 14, 2023 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Tiger 3 box office collection day 2

Tiger 3 box office collection day 2

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. अभिनेता सलमान खान व अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कमाल प्रदर्शन करत आहे. सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली आहे. चाहत्यांसाठी तर हा चित्रपट दिवाळीचं स्पेशल गिफ्ट ठरला आहे. १२ नोव्हेंबरला झालेल्या ब्लॉकबस्टर ओपनिंगनंतर ‘टायगर ३’ने दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई केली आहे. (Tiger 3 box office collection day 2)

या चित्रपटात ॲक्शनसह थ्रिलरचा मेळ पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट बराच आवडत आहे. त्यामुळे हा चित्रपट बरीच चांगलीच कमाई करताना दिसत आहे. नुकतेच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे ताजे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या शाहरुखच्या चित्रपटालाही सलमानच्या ‘टायगर ३’  चित्रपटाने मागे टाकलेलं पाहायला मिळत आहे. ‘जवान’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५३.२३ करोड रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या तुलनेत सलमानच्या चित्रपटाने धुवादार कामगिरी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा – Video : …अन् ‘टायगर ३’ चित्रपट सुरु असतानाच थिएटरमध्येच प्रेक्षकांनी फोडले फटाके, पळापळ झाली आणि…; भयानक व्हिडीओ समोर

रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५७.५० करोड रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे हिंदी, तेलुगू व तामिळ या तिन्ही भाषेतील बॉक्स ऑफिस कलेक्शन आहेत. ‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ करोड रुपयांची ग्रेट ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी पण या चित्रपटाने शानदार कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशीचा कलेक्शन आकडा हा ५७.५० करोड इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटने दोन दिवसात १०० करोडचा आकडा पार केलेला पाहायला मिळत आहे. दोन दिवसात या चित्रपटाने १०२ करोडच्या जवळपास कमाई केली आहे.   

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’ फेम तितिक्षा तावडेने आईबरोबर घरीच बनवला स्वयंपाक, पुरी-भाजी, पुलाव अन्…; व्हिडीओ व्हायरल

चित्रपटाचा कमाई आकडा वेग असाच राहिला तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट सलमान- कतरिनाच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट ठरणार यात दुमत नाही. हे दोघं या चित्रपटाचं सेलिब्रेशन अगदी सणासारखा साजरा करताना दिसत आहेत. चित्रपटगृहातही सणासुदीचं वातावरण निर्माण झालं आहे. चित्रपटातील सलमानच्या अभिनयाने तर प्रेक्षकांना व चाहत्यांना चित्रपटगृहातील खुर्चांवर उभं राहून नाचायला भाग पाडलं आहे. पडद्यावर सलमान व शाहरुखला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात त्यामुळे या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसल्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Tags: box office collectionbreak jawan gadar 2 recordday 2film collectskatrina kaifmore than 50 croressalman khantiger 3
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
anshuman vichare gave a special surprise gift to his wife

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने बायकोला पाडव्यानिमित्त दिलं खास सरप्राइज, अचानक गिफ्ट हातात दिलं अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.