बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्या दिवशी बराच प्रतिसाद मिळाला. भाईजानच्या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहायला सलमानचे काही चाहते नाचत-गाजत चित्रपटगृहात पोहोचले. चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये बराच जल्लोष पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटगृहे अगदी खचाखच भरलेली होती. अगदी चित्रपट पाहण्यासाठी सलमानचे चाहते ढोल-ताशा घेऊन चित्रपटगृहाबाहेर पोहोचले. तर काहींनी चित्रपटगृहात गोंधळही घातला. (Salman khan fans burst fire crackers)
असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लोक चित्रपटगृहात फटाके फोटताना दिसले. दिवाळीचे फटाके चित्रपटगृहातच वाजवले. फक्त छोटे फटाकेच नाही तर रॉकेटसारखे फटाकेही त्यात फुटताना दिसले.यशराज फिल्म्सच्या ‘टायगर ३’ चित्रपटने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४४ कोटींची कमाई केली. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ व इमरान हाश्मीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्कंटा लागून होती. त्याचा एक प्रताप व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे.
As Usual 💥 Salman Khan Fanclub Malegaon continues the TREND of Bursting Crackers in Theatres on Salman Khan's Entry, Though It is not advised but Fans ka emotion kon Samjhe 💀💥 #Tiger3review #Tiger3 pic.twitter.com/HIoVWKEWBp
— YOGESH (@i_yogesh22) November 12, 2023
या व्हिडीओत स्क्रीनवर चित्रपट सुरु असतानाही चित्रपटगृहात सलमानच्या एंन्ट्रीवर फटाके फोडताना दिसत आहेत. या परिस्थितीत चित्रपट पाहायला आलेले इतर लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत. ते तिथून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. या प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. जेव्हा या चित्रपटाची स्क्रीनिंग होती तेव्हा मालेगांवमध्ये सलमानच्या फॅन क्लबने फटाके फोडले होते.
Aatishbazi inside theater💥 this kind of celebration happens only for #SalmanKhan 's film🔥 #Tiger3 #Tiger3Review pic.twitter.com/LiMnFMSedW
— Devil V!SHAL (@VishalRC007) November 12, 2023
मीडिया रिपोर्ट्सनूसार, जेव्हा सलमानचा २०२१मध्ये ‘अंतिम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा असं पाहायला मिळालं होतं. तेव्हाही चित्रपटगृहात सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडले होते. हे त्यांनी सलमानचं लक्ष वेधण्यासाठी केलं होतं. खरंतर सलमानने या वर्तुवणूकीची निंदा केली होती आणि पुन्हा असं वर्तन न करण्याची ताकीद दिली होती. आगीमुळे मोठा धोका संभवू शकतो. त्याचबरोबर त्याने थिएटर मालकांना त्यांच्याबरोबर फटाके देण्याऱ्यांना थांबवलं पाहिजे.