होळी हा रंगांचा सण आहे. देशातील काही भागात हा सण उत्साहात साजरा केला जातो. होळी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. बॉलिवूडमध्येही होळीचा ट्रेंड पाहायला मिळतो. अगदी जुन्या काळापासून बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तींच्या घरी होळीसाठी सर्वजण एकत्र येत असत. एकत्रित होळी साजरी करुन होळीचा आनंद लुटत असत. पण जसा काळ सरला तसे हे प्रमाण कमी होऊ लागले. अनेक दिग्गजांनी आपल्या घरी साजरी करण्यात होळीचे सेलिब्रेशन अचानक बंद केले. कोणत्या कलाकाराने होळी साजरी करणं बंद केलं आणि का केलं याबद्दल आता जाणून घेऊया. (Bollywood actors holi celebration)
बॉलिवूडमध्ये असा एक काळ होता जेव्हा सर्व दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आपापल्या घरी होळी पार्टीचे आयोजन करायचे. पण काही कारणांमुळे हे सर्व बंद झाले. यामध्ये पाहिल्या नंबरवर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे नाव येते. ते दरवर्षी आपल्या जुहू येथील बंगल्यावर होळी पार्टीचे आयोजन करायचे. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील सगळे कलाकार सामील होत असत. पण २६ नोव्हेंबर २००८ साली ताज हॉटेलवर आतंकवादी हल्ला झाला त्यामध्ये सुमारे १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अमिताभ यांनी होळी पार्टी करणं बंद केले.
अमिताभ बच्चन यांच्यानंतर निर्माते सुभाष घईदेखील आपल्या घरी मोठ्या होळी पार्टीचे आयोजन करायचे. त्यांच्याही पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावत असत. पण अचानक काही कारणांमुळे त्यांनी होळी पार्टीचं आयोजन करणं बंद केलं.
तसेच अभिनेत्री शबाना आजमी व जावेद अख्तरदेखील आपल्या घरी होळीच्या पार्टीचे आयोजन करत असत. शबाना या पार्टीचे आयोजन त्यांचे वडील कैफी आजमी होते तेव्हापासून पार्टीचे आयोजन करत आहेत. पण २०२० साली कोरोना आल्यानंतर मात्र त्यांनी होळी पार्टीचे आयोजन करणे बंद केले.
त्यांच्याप्रमाणे दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा हे देखील आपल्या यशराज स्टुडिओमध्ये होळीच्या दिवशी मोठ्या पार्टीचे आयोजन करायचे. मात्र त्यांच्या निधनानंतर या पार्टी बंद झाल्या. दिग्गज अभिनेते राज कपूर हे देखील आपल्या आर के स्टुडिओमध्ये दरवर्षी मोठ्या होळी पार्टीचे आयोजन करायचे. सर्व दिग्गज कलाकार या पार्टीमध्ये उपस्थित राहायचे मात्र त्यांच्या निधनानंतर होळीचे सेलिब्रेशन बंद झाले.