बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कंगना रणौत लवकरच लग्नबंधनात अडकणार?, जोरदार तयारी सुरु, लग्नाच्या ड्रेसही डिझाइन केला असल्याची चर्चा, कोण असणार जोडीदार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 23, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kangana Ranaut Marriage

कंगना रणौत लवकरच लग्नबंधनात अडकणार?, जोरदार तयारी सुरु, लग्नाच्या ड्रेसही डिझाइन केला असल्याची चर्चा, कोण असणार जोडीदार?

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री तसेच स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाने आजवर अनेक हिट चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र ही अभिनेत्री केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अभिनेत्रीचे लग्न कधी होणार याची चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. खरंतर, बॉलिवूडची ‘क्वीन’ लवकरच लग्न करणार असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. (Kangana Ranaut Marriage)

Reddit वर एक रिपोर्ट व्हायरल होत आहे ज्यानुसार कंगना रणौत तिच्या लग्नासाठी खास ड्रेस बनवत असल्याचं समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, हा डिझायनर फारसा प्रसिद्ध नसला तरी ती तिच्या लग्नाचा ड्रेस फॅशन इंडस्ट्रीतील एका डिझायनरकडून तयार करून घेत आहे. कंगना कोणाशी लग्न करतेय हे अद्याप माहीत नसून या वृत्तावर कंगना रणौतकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र या वृत्तांमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा – सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो?, म्हणाला, “लग्नानंतर जबाबदारी असतानाही फुल टाइम…”

याआधीही ‘टाइम्स नाऊ’ बरोबरच्या संभाषणात कंगना रणौतने तिच्या लग्नाबाबत व तिच्या आयुष्याबाबत भाष्य केलं होतं. अभिनेत्रीने खुलासा केला की, तिला नेहमीच स्वतःचे कुटुंब असावे आणि ५ वर्षांच्या आत लग्न करायचे होते. ती म्हणाली होती, “प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की लग्न करून आपलं कुटुंब असेल. मी एक संपूर्ण कौटुंबिक व्यक्ती आहे, माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. मला लग्न करून एक कुटुंब तयार करायचे आहे आणि ते पाच वर्षानंतर होईल. अरेंज व लव्ह मॅरेज यांचं मिश्रण असेल तर ते चांगलं होईल”.

आणखी वाचा – लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुग्धा वैशंपायनचं उलटं मंगळसूत्र पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, “आमच्या कोकणात…”

कंगना रणौत तिच्या पूर्वीच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. प्रत्येक मुद्द्यावर नेहमी स्पष्ट मत देणाऱ्या विवाहित आदित्य पांचोलीबरोबर कंगनाचे कथित नातेसंबंधही खूप वादात सापडले. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या ‘राझ २’मधील तिचा सहकलाकार अध्यायन सुमनला डेट केले, परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री आता ‘इमर्जन्सी’ या राजकीय नाटकातून मोठया पडद्यावर झळकणार आहे. कंगना रणौतने या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

Tags: bolywood actressentertainmentkangana ranautKangana Ranaut Marriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Tharal Tar Mag New Promo

सायली-अर्जुनने केला महिपत शिखरेचा पर्दाफाश, सत्य येणार समोर, पूर्णा आजी करणार का सायलीचा सून म्हणून स्वीकार?, पुढे काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.