सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुग्धा वैशंपायनचं उलटं मंगळसूत्र पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, “आमच्या कोकणात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 23, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan Mangalsutra

लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुग्धा वैशंपायनचं उलटं मंगळसूत्र पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, "आमच्या कोकणात…"

‘आमचं ठरलं’ म्हणत गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. थेट एकत्र एक फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमातून मुग्धा व प्रथमेश घराघरांत पोहोचले. मुग्धा व प्रथमेश यांनी गेल्यावर्षी २१ डिसेंबरला त्यांचा शाही लग्नसोहळा उरकला. दोघांचं मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात लग्न केलं. (Mugdha Vaishampayan Mangalsutra)

मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नातील बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरलही झाले होते. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. रोजचे अनेक अनुभव ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अनेकदा काही पोस्टमुळे दोघांना ट्रोलही केलं आहे. पण दोघांनीही अशावेळी सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंडही बंद केलं आहे. नुकतीच मुग्धाने एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – सणांमध्येही फिटनेसची अशी काळजी घेतात ऐश्वर्या नारकर, होळी स्पेशल पदार्थ बनवला पण…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले आहेत. लग्नाला ३ महिने पूर्ण होताच दोघांनी शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाला ३ महिने पूर्ण होताच दोघांनी गोव्यातील मंदिरात जात दर्शन घेतले आहे. दर्शनाचे हे फोटो शेअर करत, “कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले. याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. हेची घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे|”, त्यांनी असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला ३ महिने पूर्ण, गोव्याला गेले, दत्तगुरुंचे दर्शनही घेतलं अन्…; फोटो समोर

या फोटोमध्ये मुग्धा निळ्या रंगाच्या साडीत, तर प्रथमेश फिकट हिरव्या रंगाच्या शॉर्ट कुर्ता अशा पारंपरिक अंदाजात दिसत आहे. यावेळी मुग्धाच्या गळ्यातील पारंपरिक मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने मुग्धाच्या मंगळसूत्रावरून केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. “मंगळसूत्र उलट आहे की काय अजून?”, असं म्हटलं आहे. या कमेंट दुसऱ्या एका चाहतीने कमेंट करत, “आमच्यात लग्नाला १ वर्ष किंवा पहिला गुढीपाडवा यापैकी जे आधी येईल त्या वेळेला मंगळसूत्र सरळ करतात” असं म्हणत शंकेचं निरसन केलं आहे. तर यावर काहींनी “त्यांच्या लग्नानंतर मोठा सण झाला नाही, आता पाडव्याला करतील बहुतेक सरळ मंगळसूत्र”, “गुढीपाडव्याला सरळ करतात”, “आमच्या इकडे कोकणात पाडव्याला मंगळसूत्र सरळ करतात. आता करतील”, असं म्हटलं आहे.

Tags: entertainmentmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghatemugdha vaishampayan mangalsutra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Atharva Sudame Income

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो?, म्हणाला, "लग्नानंतर जबाबदारी असतानाही फुल टाइम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.