मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेते निधन बाळ कर्वे यांचे निधन, वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 28, 2025 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bal Karve death

ज्येष्ठ अभिनेते निधन बाळ कर्वे यांचे निधन, वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bal Karve death : सर्वत्र गणेशोत्सवाचं आनंदाचं वातावरण असतानाच मराठी सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. सकाळी १०.१५च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली याबाबत त्यांची कन्या स्वाती कर्वे यांनी माध्यमांना सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. बाळ कर्वे यांना चिमणराव या मालिकेतील गुंड्याभाऊ या पात्रामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तीन दिवसांपूर्वीच बाळ कर्वे यांनी त्यांचा ९५ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर अनेक कलाकार मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अनेक दशके कलाक्षेत्रावर ठसा उमटविणाऱ्या बाळ यांनी मालिका, नाटक या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ अशा नाटकांमध्ये बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. तर ‘प्रपंच’, ‘राधा ही बावरी’, ‘वहिनीसाहेब’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. ‘चिमणराव’ या मालिकेतील गुंड्याभाऊ या पात्रामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘जैत रे जैत’ हा बाळ कर्वे यांचा पहिला चित्रपट. यानंतर त्यांनी ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ या चित्रपटात काम केले.

आणखी वाचा – रोबोटिक मोदक व २२ उंदीर आणि…; देशमुखांच्या बाप्पासाठी रितेश-जिनिलियाच्या लेकांची हटके संकल्पना, संस्कारांचं कौतुक

बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी त्यांना सगळेच ‘बाळ’ अशी हाक मारू लागले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते स्थापत्य अभियंता झाले. मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली.

Tags: Bal Karve deathbal karve passed awaymarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Sumant Thakre Ganeshotsav

"पुन्हा येतील का असे दिवस?", 'आई कुठे…' फेम अभिनेता रमलाय गणेशोत्सवातील बालपणीच्या आठवणीत, म्हणाला, "कोण श्रेष्ठ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.