genelia and riteish deshmukh ganesh festival : रितेश देशमुख आणि त्याचे कुटुंबाचा प्रत्येक सण साजरा करण्याकडे विशेष कल असतो. नेहमीच त्यांचे सण साजरे करण्याची पद्धत पाहून सगळ्यांना आनंद होतो. सगळेच त्यांच्या एकजुटीचं भरभरुन कौतुक करतात. अशातच रितेश आणि त्याच्या कुटुंबाने यंदाचा पहिला गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात आणि खास पद्धतीने साजरा केला आहे. देशमुखांकडे इको फ्रेंडली गणपती बाप्पाची पद्धत आहे. दरवर्षी रितेश मुलांना घेऊन कधी शाडूच्या मातीचे, कधी पेपरपासून घडवलेल्या मूर्तीची आराधना करतो. देशमुखांची सगळीच लहान मुलं एकत्र येत जोरदार तयारी करतात. यंदा मात्र रितेशच्या दोन्ही मुलांनी रियान आणि राहीलने पुढाकार घेत यंदा बाप्पाच्या डेकोरेशनची जबाबदारी घेतली.
रितेश व जिनिलियाने पुढाकार घेत त्यांच्या मुलांना भरपूर पाठिंबा दिला. सोशल मीडियावरही त्यांचं भरभरुन कौतुक झालं. दोघांनी बाप्पाच्या आगमनाची तयारी दोन ते तीन महिने आधीपासून केली होती. यंदा त्यांनी बाप्पाचा देखावा हा रोबोटिक गेमिंग थीमनुसार करायचं ठरवलं होतं. आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. याचा व्हिडीओ रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. इतकंच नाहीतर या थीमसाठी रितेशनेही मुलांचं स्वागत केलं.
व्हिडीओ शेअर करत रितेश म्हणाला, “नमस्कार, दरवर्षी गणपतीचा सण आला की, आम्ही विचार करत असतो यंदा बाप्पाची मूर्ती कशी घडवायची. एक वर्ष आम्ही क्लेचा वापर करून बाप्पाची मूर्ती घडवली होती. एकदा वर्तमानपत्रांचा वापर केला होता, त्यानंतर मेटलचा वापर आम्ही बाप्पाची मूर्ती बनवली होती. पण, यावर्षी मी मुलांना म्हणालो, काहीतरी नवीन करुयात. माझ्या मुलांनी रोबोटिक क्लास जॉईन केला होता. त्यामुळे यंदा रोबोट, बाप्पा आणि फूसबॉल (foosball) अशी थीम त्यांनी निवडली. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांचा बाप्पाची मूर्ती घडवण्याचा प्रवास सुरू केला होता. २२ उंदीर मामा, २ रोबोटिक मोदक आणि आपले गणपती बाप्पा…हे सगळं मुलांनी प्रशिक्षकांच्या मदतीने डिझाइन केलं होतं”.
“पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.” असं जिनिलीयाने या व्हिडीओच्या शेवटी म्हटलं. या व्हिडीओमध्ये रितेश जिनिलीयाची मुलं रियान-राहील तसेच अमित व धीरज देशमुख यांची मुलं या सगळ्यांनी एकत्र मिळून बाप्पासाठी सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे.





