शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कलाच्या EXIT नंतर मालिका संपली, ईशा केसकरची पहिली पोस्ट; म्हणाली, “अचानक निरोप घेतल्याबद्दल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 13, 2025 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Isha Keskar Post Viral

मालिकेतील EXIT नंतर ईशा केसकरची पहिली पोस्ट

Isha Keskar Post Viral : ‘स्टार प्रवाह’ वाहिनी नेहमीच नवनवीन मालिका आणि वेगळ्या कथानकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. काही मालिका या केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित न राहता थेट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. कथानकाशी जोडले गेलेले प्रेक्षक हळूहळू त्या मालिकेतील मुख्य पात्रांशी आणि कलाकारांशी भावनिक नातं जोडतात. त्यामुळेच एखाद्या मालिकेतील लोकप्रिय कलाकाराने अचानक मालिका सोडल्यास त्याचा थेट परिणाम प्रेक्षकांच्या भावना तसेच मालिकेच्या टीआरपीवर होताना दिसतो.

अशाच प्रकारची परिस्थिती ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ बाबत पाहायला मिळाली. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मालिकेतील कला आणि अद्वैत या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं होतं. या जोडीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. मात्र, दरम्यान कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिने काही वैयक्तिक कारणांमुळे मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. ही बातमी समजताच अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर निर्मात्यांकडून कलाच्या भूमिकेऐवजी नव्या अभिनेत्रीची एंट्री करण्यात आली. मात्र, प्रेक्षकांना हा बदल स्वीकारता आला नाही. परिणामी, याचा थेट परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख सांगत स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

अखेर १२ डिसेंबर २०२५ रोजी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या लोकप्रिय मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर अभिनेत्री ईशा केसकर हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मालिकेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे खास आणि आठवणींचे क्षण एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. त्यासह कॅप्शनमध्ये तिने लिहीलं की, “कला… अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून Sorry. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहीन. Thank you so much for everything.” या शब्दांत तिने प्रेक्षकांसह मालिकेच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले आहेत. दरम्यान, अभिनेत्री इशा केसकरला पुन्हा एका नव्या आणि दमदार भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत.

आणखी वाचा – दुसऱ्या लग्नानंतर मराठी अभिनेत्री पोहोचली देव दर्शनाला, जेजुरी गड चढताना नवऱ्याने उचलून घेतलं अन्…; व्हिडीओ समोर

Tags: Isha Keskar Post ViralLakshmichya Pavalanimarathi actressmarathi entertainment newsmarathi malika
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Lagnanantar Hoilach Prem Actor Wedding

मालिकाविश्वातील आणखी एक चेहरा अडकला लग्नबंधनात, झाला डोंबिवलीचा जावई, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.