सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्या लग्नानंतर मराठी अभिनेत्री पोहोचली देव दर्शनाला, जेजुरी गड चढताना नवऱ्याने उचलून घेतलं अन्…; व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2025 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shubhangi sadavarte jejuri dev darshan

दुसऱ्या लग्नानंतर मराठी अभिनेत्री पोहोचली देव दर्शनाला, जेजुरी गड चढताना नवऱ्याने उचलून घेतलं अन्…; व्हिडीओ समोर

shubhangi sadavarte jejuri dev darshan : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा विवाहबंधांत अडकली असल्याचं समोर आलं. थेट केळवणाचा व्हिडीओ शेअर करत तिने लग्नाची बातमी दिली. घटस्फोटाच्या तीन महिन्यांतच तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री म्हणजे ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते. शुभांगीने मागील आठवड्यात दुसऱ्यांदा लग्न केलं. सुमित म्हशेळकर यांच्याशी तिने लग्न केले. अत्यंत साधेपणाने त्यांनी लग्न उरकलं. कमीत कमी माणसं आणि फक्त कुटुंबीय यांच्या उपस्थितीत शुभांगी आणि सुमित लग्नबंधनात अडकले.

आता लग्नानंतर ही जोडी देवदर्शनाला गेली आहे. शुभांगी आणि सुमित लग्नानंतर जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. याचा व्हिडीओ त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जेजुरीला गेल्यावर सुमितने शुभांगीला उचलून घेत जेजेरी गडाच्या पायऱ्या चढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. भंडारा उधळत त्यांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. हा व्हिडीओ पाहून नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

आणखी वाचा – “मी स्वतःला बदलू शकत नाही”, ‘धुरंधर’ चित्रपटाच्या चर्चेदरम्यान अक्षय खन्नाचं वक्तव्य व्हायरल, म्हणालेला, “इंडस्ट्री सोडेन…”

View this post on Instagram

A post shared by Sumeet Mhashelkar (@sumeet.mhashelkar)

“येळकोट येळकोट जय मल्हार”, असं म्हणत शुभांगीच्या पतीने म्हणजे सुमित म्हशेळकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शुभांगी सदावर्तेचे पहिले लग्न “संगीत देवबाभळी” नाटकाला संगीत देणाऱ्या आनंद ओक यांच्याशी झाले होते. ११ जुलै रोजी शुभांगी आणि आनंद यांनी करोना काळात लग्न केले. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर शुभांगी आणि आनंद या दोघांचा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला सदावर्ते आणि ओक कुटुंबातील मोजके नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होती.

आणखी वाचा – अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण, वल्लरी विराजची ‘झी मराठीवर’ दमदार एंट्री; ‘या’ मालिकेत दिसणार

शुभांगीच्या पहिल्या पतीने घटस्फोटाची बातमी दिली होती. पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “प्रिय मित्रांनो, शुभांगी आणि मी काही वर्षांपूर्वी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय स्वीकारण्यासाठी आणि तो दृढ करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला आणि आता तो मोकळेपणाने सांगण्यासाठी हाच योग्य क्षण वाटतो. आम्ही एकत्र घालवलेल्या वेळेबद्दल आणि आम्ही एकत्र चाललेल्या प्रवासाबद्दल मी आभारी आहे”.

Tags: jejuri dev darshanmarathi actressshubhangi sadavarte
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Marathi actress marriage updates

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख सांगत स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.