Lagnanantar Hoilach Prem Actor Wedding : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मराठी कलाविश्वातही लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळालं. एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकताना दिसली. सोशल मीडियावर तर या कलाकारांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. सूरज चव्हाण-संजना, सोहम बांदेकर- पूजा बिरारी, निमिष कुलकर्णी, शुभांगी सदावर्ते, मेघन जाधव-अनुष्का पिंपुटकर ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकला असल्याच समोर आलं आहे.
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून घराघरांत झळकलेला अभिनेता भाग्येश पाटील नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. भाग्येशने या मालिकेत दीपक हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. भाग्येशने प्रेरणा धुरी हिच्याशी लग्नगाठी बांधली आहे. काल १२ डिसेंबर रोजी भाग्येश व प्रेरणा एकमेकांचे जीवनसाथी झाले. भाग्येश पाटीलच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल हात आहे. यांत नववधूवर जोडपं खूपच सुंदर दिसत आहेत.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख सांगत स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
दोघांनी लग्नासाठी मॅचिंग कपडे निवडले आहेत. सप्तपदीसाठी दोघांनी हिरव्या रंगाचे पोशाख परिधान केले आहेत. प्रेरणाने हिरवी साडी आणि त्यावर वर्क केलेला ब्लाउज परिधान केला आहे, तर भाग्येशने पांढरा कुर्ता आणि त्यावर हिरवा शेला आणि हिरवं धोतर नेसलं आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत भाग्येश-प्रेरणा यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
भाग्येशने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आदित्य इनामदारची भूमिका केली होती. त्यानंतर तो ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसला. तो साकारत असलेल्या दीपक या पात्राचं नंदिनीवर एकतर्फी प्रेम आहे. तो नंदिनीला मिळवण्यासाठी रम्या व वसुंधराबरोबर हातमिळवणी करतो, असं मालिकेत पाहायला मिळालं.





