Marathi actress marriage updates : गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकले असल्याचं समोर आलं. सूरज चव्हाण-संजना, सोहम बांदेकर- पूजा बिरारी, निमिष कुलकर्णी, शुभांगी सदावर्ते, मेघन जाधव-अनुष्का पिंपुटकर ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. यांत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीच नाव जोडलं जाणार आहे. मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार आहे. याबाबत अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे. मराठी मालिकाविश्वातील हा लोकप्रिय चेहरा लग्नबंधनात अडकणार आहे.
गौरीने सोशल मीडियावर लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी दिली. गौरी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. गौरीने याआधी अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आई कुठे काय करते मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच आता सोशल मीडियावरच तिने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत लग्न करणार असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा – अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण, वल्लरी विराजची ‘झी मराठीवर’ दमदार एंट्री; ‘या’ मालिकेत दिसणार

गौरीनं इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्यांनं तिला लग्न कधी करतेस? असं विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देत थेट तिने तिच्या लग्नाची तारीखच सांगून टाकली. गौरीनं ५ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं या उत्तरामध्ये सांगितलं. आता खरंच गौरी लग्न करणार का याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
पण गौरीनं चाहत्याच्या प्रश्नाचं खोटं उत्तर दिलं आहे. तिनं प्रश्न विचारताना म्हटलं की, “मला काहीही विचारा; मी खोटं बोलेन”, त्यामुळे तिनं चाहत्याच्या प्रश्नांची खोटी उत्तरं दिली आहेत. दरम्यान, याआधीही तिला एका चाहत्यानं लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हाही तिनं “आहे पण आणि नाही पण…” असं उत्तर दिलं होतं.





