बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराबरोबरच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत येतो. याआधी त्याचे ‘एक व्हिलन रिटर्न्स’ व ‘कुत्ते’ हे चित्रपट येऊन गेले. मात्र, त्या चित्रपट बॉक्स सपशेल अपयशी ठरले. प्रत्येक चित्रपटात त्याच्या याच अभिनयाने ट्रोल होणारा अर्जुन आता त्याच्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द लेडी किलर’ असं या चित्रपटाचं नाव असून ज्याचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. ट्रेलर समोर येताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. (The Lady Killer Trailer out)
अजय बहल दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुनसह अभिनेत्री भूमि पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर दोन मिनिट २२ सेकंदाचा आहे. ज्याची सुरुवात अर्जुनच्या गोळी लागल्याने होते. अर्जुन जेव्हा एका महाराजाला भेटण्यासाठी त्यांच्या जुन्या शाही बंगल्यात पोहोचतो. तेव्हा तिथे त्याची भेट भूमिशी होते. त्यानंतर दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीला सुरुवात होते. मात्र, जसजशी कथा पुढे सरकते, तसतसा भूमिचं खरं रूप अर्जुनसमोर येतो. पुढे अर्जुनच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या महिलेची एन्ट्री व त्यात आलेले भयानक वळणे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
एक मर्डर मिस्ट्री असलेला हा चित्रपट पूर्णपणे सस्पेंन्सने भरलेला असल्याचं या ट्रेलरमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, अर्जुन व भूमि या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसत असून यावेळी या दोघांमध्ये अनेक बोल्ड सीन्स असल्याचंही या ट्रेलरमध्ये स्पष्ट असल्याचं दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘तेजस’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळताच कंगना रणौतने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “९९ टक्के चित्रपटांना…”
दरम्यान, चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं असून जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच चाहत्यांनी अर्जुनच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेचे देखील प्रचंड कौतुक केले आहे. एक नेटकरी यावर म्हणाला की, “हा चित्रपट अर्जुनच्या करिअरमधील सर्वात उत्तम चित्रपट ठरणार आहे.” त्याचबरोबर अनेकांनी अर्जुन व भूमीच्या केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसले. मात्र, काही नेटकरी अभिनेत्याला ट्रोल करताना दिसले. ‘बीए पास’, ‘सेक्शन ३७५’ सारखे अनेक चित्रपट देणाऱ्या अजय बहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.