बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित ‘तेजस’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करण्यास अपयशी ठरला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर आतापर्यंत अवघ्या २ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळवूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यास अपयश ठरला आहे. अशातच कंगना रणौतने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. (Kangana Ranaut appeals to fans for watch ‘Tejas’ movie)
कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तिच्या चाहत्यांना तेजस चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. “कोरोना लॉकडाऊन नंतर लोकांचे चित्रपटगृहांकडे जाण्याचे प्रमाण खूपच कमी होत आहे. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मोफत तिकिटे आणि वाजवी ऑफर्स देऊनही ही चित्रपटगृहे बंद होत आहे. त्यामुळे मी चाहत्यांना एक विनंती करते की, तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद लुटा. अन्यथा हे चित्रपटगृह जास्त दिवस टिकणार नाही.”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.
हे देखील वाचा – शुभांगी गोखले दर दोन वर्षांनी करतात त्यांच्या साड्यांचा सेल, स्वतःच खुलासा करत म्हणाल्या, “साड्यांना…”
तर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “नमस्कार मित्रांनो, गेल्याच आठवड्यात आमचा ‘तेजस’ चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. ज्यांनी हा चित्रपट पाहिला ते आमचं कौतुक करत आहे, आम्हाला आशीर्वाद देत आहेत. पण मित्रांनो, कोरोनानंतर आपली बॉलिवूड इंडस्ट्री पूर्णपणे रिकव्हर होत नाही. ९९ टक्के चित्रपटांना प्रेक्षक संधीच देत नाही. मला माहित आहे की, या आधुनिक काळात सर्वांकडे स्वतःचा मोबाईल फोन आणि घरात टीव्ही आहे. मात्र, चित्रपटगृहे हे सुरुवातीपासूनच आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. नृत्य, कला, लोकसंगीत, नाटक यांसारख्या अनेक कला आपल्या सामाजिक सुधारणेचा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विशेषकरून मल्टिफ्लेक्सच्या प्रेक्षकांना एक विनंती करते की, जर तुम्ही याआधी ‘उरी’, ‘नीरजा’, ‘मेरी कॉम’ यांसारख्या चित्रपटांचा आनंद घेतला असेल. तर मला खात्री आहे, तुम्हाला हा ‘तेजस’ नक्की आवडेल.”
हे देखील वाचा – Video : …अन् भर रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी घेतले शत्रुघ्न सिन्हा यांचे आशीर्वाद, पत्नी व लेक सोनाक्षीची घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
Even before covid theatrical footfalls were dipping drastically post covid it has become seriously rapid.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 28, 2023
Many theatres are shutting down and even after free tickets and many reasonable offers drastic footfall decline is continuing.
Requesting people to watch films in theatres… pic.twitter.com/Mty9BTcpkD
पण तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मात्र तिला जोरदार ट्रोल केलं आहे. तसेच, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची नावे घेत तिला यावरून खडसावले. एकूणच या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सर्वेश मेवारा दिग्दर्शित या चित्रपटात कंगना पायलट तेजस गिलची भूमिका साकारताना दिसली. अभिनेत्रीला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा होत्या, मात्र चित्रपटाने त्या अपेक्षा फोल ठरवल्या आहेत. याआधी ती ‘चंद्रमुखी २’ चित्रपटात दिसली होती, तिलादेखील मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे. आता, ती लवकरच ‘Emergency’ चित्रपट घेऊन येणार आहे. जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.