शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या पायाला गोळी लागलेली तेव्हा…”, गोविंदाचे भाचा कृष्णा अभिषेकबद्दलचे ‘ते’ भाष्य चर्चेत, म्हणाला, “तो खूप…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 1, 2024 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
The Great Indian Kapil Show Season 2 fame Krishna Abhishek cried when Govinda was shot in the leg.

पायाला बंदुकीची गोळी लागली होती तेव्हा कृष्णा अभिषेक रडला होता, स्वत: गोविंदाने द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन २ मध्ये केला खुलासा

बॉलीवूड अभिनेता गोविंदा नुकताच कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’मध्ये सहभागी झाला. यावेळी तो चंकी पांडे आणि शक्ती कपूर यांच्याबरोबर आला होता. शोमध्ये आपल्या मामाला पाहून कृष्णा अभिषेक स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने गोविंदाला मिठी मारली. शो दरम्यान, गोविंदाने खुलासा केला की, जेव्हा त्याने चुकून स्वतःवर गोळी झाडली तेव्हा कृष्णा त्याच्यासाठी खूप रडला. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून काही कारणांमुळे भांडणे होती. पण अता ही भांडणे संपली आहेत. दोघांनी या वादावर आता कायमचा पडदा टाकला आहे. (Govinda on Krishna Abhishek)

गोविंदा जेव्हा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’ मध्ये पोहोचला तेव्हा कृष्णा अभिषेकने “आम्ही खूप वर्षांनंतर भेटलो आहोत,  त्यामुळे आज मी तुला (गोविंदाला) सोडणार नाही” असे म्हणत त्याला मिठी मारली. मग दोघांनी एकत्र डान्स केला आणि एकेमकांची मस्करीदेखील केली. कृष्णा अभिषेक शोमध्ये चंकी पांडेबद्दल विनोद करतो.

यावेळी तो विनोद करताना असं म्हणतो की “एक दिवस मी चिकन बिर्याणी बनवत होतो आणि त्यात घालायला वेलची नव्हती. मी काहीतरी विचारायला त्याच्याकडे गेलो. त्याने मला दोन वेलचीच्या शेंगा दिल्या आणि चार पायांचे तुकडे घेतले. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्याला लेग पीस मिळाले पण त्याने ते न खाऊन एक चिकन विकत घेतले. आता कोंबडी अंडी घालते आणि ती १० रुपयांना विकते”.

आणखी वाचा – मराठी कलाकारांची लगीनघाई, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्याही केळवणाला सुरुवात, फोटोंनी वेधलं लक्ष

कृष्णाच्या या संवादादरम्यान, गोविंदा सर्वांना म्हणतो की, “कृष्णा खूप फालतू बोलतोय. काही दिवसांपूर्वी माझ्या पायाला गोळी लागली तेव्हा तो (कृष्णा) रडत होता. आणि आता तो लेग पीसवर विनोद सांगत आहे. तो खूप हुशार आहे”.

आणखी वाचा – रविवारी तूळ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल तर मकर राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल, अधिक जाणून घ्या…

दरम्यान, गेल्या ऑक्टोबरमध्ये गोविंदाने चुकून स्वत:वर गोळी झाडली होती. त्यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि यानंतर अभिनेता काही काळ उपचार घेत होते. त्यावेळी मतभेद असतानाही कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह काका गोविंदाला भेटायला आले होते. त्यानंतर अखेर आता या दोन्ही कुटुंबांधील वाद संपले आहेत.

Tags: govindaGovinda on Krishna Abhishekkrushna abhishek
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
aai kuthe kay karte fame anish aka actor Sumant Thakre shared an emotional post after the end of the serial

“माझ्या पदार्पणाची मालिका आणि…”, मालिका संपताच अभिनेत्याला भावना अनावर, म्हणाला, “विचित्र मार्गाने संधी येते पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.