सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या पदार्पणाची मालिका आणि…”, मालिका संपताच अभिनेत्याला भावना अनावर, म्हणाला, “विचित्र मार्गाने संधी येते पण…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 1, 2024 | 11:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aai kuthe kay karte fame anish aka actor Sumant Thakre shared an emotional post after the end of the serial

आई कुठे काय करते मालिका संपताच सुप्रसिद्ध अभिनेता भावुक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

स्टार प्रवाह वरील लोकप्रिय आई कुठे काय करते या मालिकेचा प्रवास नुकताच संपला. काल म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. गेली पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेबरोबरच मालिकेतेली कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, रुपाली, अभिषेक, यश, ईशा, कांचन आजी, आप्पा या मुख्य पात्रांबरोबरच नव्याने आलेल्या कलाकारांनाही प्रेक्षकांनी तितकेच भरभरून प्रेम केले. यापैकीच एक नवोदित कलाकार म्हणजे सुमंत ठाकरे. मालिकेत त्याने अनिष ही ईशाच्या बॉयफ्रेंड व कालांतराने तिच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. (Sumant Thakre Emotional Post)

अशातच त्याने आता मालिका संपताच सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सुमंत ठाकरेने मालिकेतील अनिषच्या भूमिकेतील आणि इतर कलाकारांबरोबरचे फोटो शेअर करत असं लिहिलं आहे, “पहिली नेहमी खास असते… काल ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. हे थोडं अस्वस्थ करणारं आहे पण हा प्रवास समृद्ध करणारा आहे. कधी कधी संधी विचित्र मार्गाने येते, तो मार्ग जितका विचित्र तितकाच ती स्वीकारल्यावरचा प्रवास सुखद, असं माझं मत आहे. मी प्रदीप दादाचा नेहमी ऋणी राहीन. नमिता वर्तक तुझं मार्गदर्शन, योग्य निर्णय घ्यायला मदत करणं, पात्र समजावून सांगणं, चूक सुधारायला लावणं, नको त्या गोष्टींसाठी उगाच रागावणं सगळ्याचसाठी खूप धन्यवाद… तुझ्यामुळे ही संधी मिळाली”.

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “DKP सारखं प्रोडक्शन हाऊस मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आमचे कॅप्टन रवी सर. त्यांच्या संवेदनशील, डोळस, शांत आणि चिकित्सक दृष्टिकोनामुळे हा ‘प्रवाह’ इथवर आला आहे. मराठी रंगभूमी घडवणाऱ्या, जगवणाऱ्या दिग्गजांचे त्यांच्यावर संस्कार आहेत. नटाला समाधान देणारे क्षण सरांच्या कामात असतात. त्याची शैली हे दाखवते की त्यांची दिग्दर्शनाची ताकद काय आहे, भविष्यात त्यांच्या हातून अनेक कलाकृती घडाव्या, हीच ईच्छा. त्यांचे खंदे सहकारी, तितकेच गुणी, आपला वेगळा विचार ठामपणे मांडणारे, पडद्यामागून शांतपणे काम करणारे आणि तेवढ्याच खोडकरपणे एखाद्या शब्दाचा चोथा करणारे आयुष्यभरासाठी लाभलेले मित्र, कोटी कंपनीचे मालक तुषार आणि सुबोध दादा”.

View this post on Instagram

A post shared by Sumant Thakre (@sumant_thakre)

आणखी वाचा – “माझ्या पायाला गोळी लागलेली तेव्हा…”, गोविंदाचे भाचा कृष्णा अभिषेकबद्दलचे ‘ते’ भाष्य चर्चेत, म्हणाला, “तो खूप…”

पुढे सुमंतने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रत्येक डिपार्टमेंटमधील मित्रांशी जडलेली मैत्री आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्या गुणी हरहुन्नरी हुशार सहकलाकारांनी हा प्रवास फुलवला. मधुराणीने साकारलेली आई मला कधीही विसरता येणार नाही. ईला ताईसारख्या प्रेमळ आजी जी खऱ्या आयुष्यात आणखीन जास्त प्रेम करते. माझ्या जगात सामील होऊन माझ्या आयुष्याचा मोठा भाग बनलास ओंकार, तुझे आभार कसे मानू. अपूर्वा, तुझं वेळोवेळी मदत करणं, इतक्या आठवणी, सीन्स, त्यावर चर्चा, गाणी, आणि माझी गॉडमदर होणं, यासाठी मनापासून धन्यवाद”.

आणखी वाचा – रविवारी तूळ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल तर मकर राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल, अधिक जाणून घ्या…

यापुढे सुमंत या पोस्टमध्ये असं म्हणतो की, “या प्रवासाने मला शिकवलं की एक मालिका का लोकप्रिय ठरते—ती फक्त कथा नाही तर त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रेमाने आणि मेहनतीने साकार होते. मला भेटलेली माणसं आयुष्यभर साथ देतील, हे समाधान आहे. ‘आई कुठे काय करते’ ही माझ्या पदार्पणाची मालिका आहे आणि कायम हृदयाच्या जवळ राहील. खूप खूप प्रेम”.

Tags: aai kuthe kay karteaai kuthe kay karte off airSumant Thakre Emotional Post
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bollywood actress Shilpa Shetty husband Raj Kundra summoned by the ED and appear for questioning on Monday in the pornography case.

मोठी बातमी! पोर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीकडून समन्स, चौकशीला हजर राहवे लागणार अन्यथा...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.