बॉलीवूड अभिनेता गोविंदा नुकताच कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’मध्ये सहभागी झाला. यावेळी तो चंकी पांडे आणि शक्ती कपूर यांच्याबरोबर आला होता. शोमध्ये आपल्या मामाला पाहून कृष्णा अभिषेक स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने गोविंदाला मिठी मारली. शो दरम्यान, गोविंदाने खुलासा केला की, जेव्हा त्याने चुकून स्वतःवर गोळी झाडली तेव्हा कृष्णा त्याच्यासाठी खूप रडला. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून काही कारणांमुळे भांडणे होती. पण अता ही भांडणे संपली आहेत. दोघांनी या वादावर आता कायमचा पडदा टाकला आहे. (Govinda on Krishna Abhishek)
गोविंदा जेव्हा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’ मध्ये पोहोचला तेव्हा कृष्णा अभिषेकने “आम्ही खूप वर्षांनंतर भेटलो आहोत, त्यामुळे आज मी तुला (गोविंदाला) सोडणार नाही” असे म्हणत त्याला मिठी मारली. मग दोघांनी एकत्र डान्स केला आणि एकेमकांची मस्करीदेखील केली. कृष्णा अभिषेक शोमध्ये चंकी पांडेबद्दल विनोद करतो.
यावेळी तो विनोद करताना असं म्हणतो की “एक दिवस मी चिकन बिर्याणी बनवत होतो आणि त्यात घालायला वेलची नव्हती. मी काहीतरी विचारायला त्याच्याकडे गेलो. त्याने मला दोन वेलचीच्या शेंगा दिल्या आणि चार पायांचे तुकडे घेतले. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्याला लेग पीस मिळाले पण त्याने ते न खाऊन एक चिकन विकत घेतले. आता कोंबडी अंडी घालते आणि ती १० रुपयांना विकते”.
आणखी वाचा – मराठी कलाकारांची लगीनघाई, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्याही केळवणाला सुरुवात, फोटोंनी वेधलं लक्ष
कृष्णाच्या या संवादादरम्यान, गोविंदा सर्वांना म्हणतो की, “कृष्णा खूप फालतू बोलतोय. काही दिवसांपूर्वी माझ्या पायाला गोळी लागली तेव्हा तो (कृष्णा) रडत होता. आणि आता तो लेग पीसवर विनोद सांगत आहे. तो खूप हुशार आहे”.
आणखी वाचा – रविवारी तूळ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल तर मकर राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल, अधिक जाणून घ्या…
दरम्यान, गेल्या ऑक्टोबरमध्ये गोविंदाने चुकून स्वत:वर गोळी झाडली होती. त्यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि यानंतर अभिनेता काही काळ उपचार घेत होते. त्यावेळी मतभेद असतानाही कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह काका गोविंदाला भेटायला आले होते. त्यानंतर अखेर आता या दोन्ही कुटुंबांधील वाद संपले आहेत.