शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

The Great Indian Kapil Show मधील विनोदी अभिनेत्यावर प्रेक्षक नाराज, तृप्ती डिमरीला विचारलं असं काही…; नेटकरी म्हणाले “हाच प्रश्न रणबीरला…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 4, 2024 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
The Great Indian Kapil Show fame Sunil Grover asked Tripti Dimri about the bold scene in Animal netizens are upset

The Great Indian Kapil Show मध्ये सुनील ग्रोव्हरने तृप्ती डिमरीला विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

टेलिव्हिजन गाजवल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्माने अलीकडेच त्याचा मोर्चा ओटीटीकडे वळवला. नेटफ्लिक्सवरील त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे या कार्यक्रमावर व कार्यक्रमातील विनोदी कलाकारांवर काही नेटकरी मंडळी नाराज आहेत. त्याचं झालं असं की, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच या चित्रपटातील कलाकारांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रमोशनसाठी हजेरी लावली. (The Great Indian Kapil Show Audience Upset)

यावेळी विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हरने अभिनेत्री तृप्ती डिमरीबरोबर केलेल्या संवादामुळे काही नेटकरी मंडळी नाराज झाली आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका सेगमेंटमध्ये सुनील ग्रोव्हरचे पात्र ‘डफली’ तृप्ती डिमरीबरोबर संवाद साधताना दिसले. ‘डफली’ने तिला प्रथम विचारले की, “ही तीच व्यक्ती आहे ना जी ‘ॲनिमल’ चित्रपटात होती?”. यावर तृप्ती म्हणाली “हो ती मीच आहे”. त्यानंतर ‘डफली’ने तिला चित्रपटातील रणबीरबरोबरच्या तिच्या बोल्ड सीन्सबद्दल प्रश्न केला आणि विचारले की, “ते सीन खरे आहेत की खोटे?”.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?

‘डफली’ म्हणाली, “रणबीर कपूरबरोबर तू जे काही केलंस, मला आशा आहे की ते फक्त शूटिंग होते. प्रत्यक्षात असे काही नव्हते, बरोबर?”. यावर तृप्ती मोठ्याने हसली आणि म्हणाली की, “हो ते खोटे आहे”. मग ‘डफली’ आनंदाने उड्या मारू लागला आणि ते मित्र होऊ शकतात म्हणून ओरडायला लागले. त्यांच्यातील हा संवाद उपस्थितांनी एन्जॉय केला. मात्र नेटकरी यावर काहीसे नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – 04 November Horoscope : सर्वार्थ सिद्धी योगामुळे कर्क आणि कन्या राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…

एका नेटकऱ्याने याबद्दल असं म्हटलं आहे की “हा प्रश्न डफलीने रणबीर कपूरला का नाही विचारला? पण तृप्तीला विचारत आहे”. तर आणखी एकाने “थर्ड क्लास कॉमेडीसाठी स्त्रीला असं अस्वस्थ करणं हे हास्यास्पद आहे?” अशी कमेंट करत प्रश्न विचारला आहे. तर आणखी एकाने “हे खूप वाईट आहे की याला “विनोद” म्हणून संबोधले जात आहे”. तसंच काहींनी हा विनोद तृप्तीने अगदी उत्तम रित्या हातळल्याचे म्हणत तिचे कौतुक केले आहे.

Tags: entertainment newsThe Great Indian Kapil Show Audience Upsettrupti dimri
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar Answers To Netizen

"तुमचे येडे चाळे समाज हितासाठी का?", नारकर कपलला पुन्हा नेटकऱ्यांनी डिवचलं, म्हणाल्या, "तुमच्या सारख्या लोकांना गाडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.