Aishwarya Narkar Answers To Netizen : कलाकार मंडळी म्हटलं की टीका होणारचं. अनेक कलाकार मंडळी अशी आहेत जी अनेकदा ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळाली आहेत. बरेचदा ही कलाकार मंडळी नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात तर काहीवेळा ही कलाकार मंडळी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. अशातच नेहमीच ट्रोलिंगमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या त्यांच्या रील व्हिडीओमुळे ट्रोल होताना दिसतात. अनेकदा त्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्याने केलेल्या कमेंटवर ऐश्वर्या नारकर भडकल्या आहेत.
ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्याबरोबर वेळ घालवतानाचा एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्याने कमेंट करत ऐश्वर्या यांना डिवचलं आहे. ऐश्वर्या यांना समाज कल्याणावरुन नेटकऱ्याने खोचक सवाल करत कमेंट केली आहे. यावर ऐश्वर्या यांनीही थेट प्रतिउत्तर देत नेटकऱ्याला खडसावलं आहे. ऐश्वर्या या नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
अशातच ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “तुमच्याकडून समाज हितासाठी काय योगदान आहे का आणि केले आहे का?, आपणाला याच लोकांनी पसंत केले. तुमचे चित्रपट आवडीने बघितले. तुमचे कामही ते बघतात. तुम्ही समजाचे काही देणे लागता हे लक्षात असू दया. गरजू व गरीब लोकांसाठी समाजासाठी काही करत असाल तर कळवा. आम्हाला उगाच उट सूट येडे चाळे करता काय तुमच्याकडून आदर्श घेणार हा समाज. हे आजोबा येडे चाळ्यांतले आणि तुम्ही काकू. आता तुम्हाला तसेच हात जोडतो”.
नेटकऱ्याच्या या कमेंटवर ऐश्वर्या यांनी प्रतिउत्तर देत असं म्हटलं की, “गाडेकर तुमच्या सारख्या उपद्रवी लोकांना गाडून समाज सुखी बनवण्याचं योगदान करायचंय”. एकूणच ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला सुनावत त्याची ही कमेंट इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केली आहे.