गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 25, 2026 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pach Futacha Bachchan Marathi Movie

'पाच फुटाचा बच्चन' चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

Pach Futacha Bachchan Marathi Movie : नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे .

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचं संकलन, शंतनु-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. तसेच निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. या सगळ्यात ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

आणखी वाचा – तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या टीजर पोस्टरनंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या सिनेमाच्या आकर्षक चित्रशीर्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या टीजर पोस्टरवरुन हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याच्याशी निगडीत आहे असे दिसत आहे. एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती रिंगण करून कीर्तनात दंग झालेले वारकरी असे हे चित्र आहे. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

आणखी वाचा – दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पाच फुटाचा बच्चन’या एकपात्री नाटकाचा प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या प्रयोगांनाही तुफान प्रतिसाद मिळत राहिला. मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे प्रयोग केले. अनेक पुरस्कारांमध्ये नामांकन, पुरस्कार मिळाले, महोत्सवांमध्ये नाटकाचं सादरीकरण झालं. नाटकावर येत असलेल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढत होता. या नाटकावर चित्रपट होऊ शकतो याची जाणीव होत होती. निर्माते राहुल कर्णिक यांनी या नाटकाचा चित्रपट करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे नाटकाचे प्रयोग योग्य टप्प्यावर थांबवून आम्ही चित्रपट निर्मितीच्या कामाला सुरुवात केली . अस्सल मातीतली कथा भव्य स्वरुपात पडद्यावर चित्रित करण्यासाठी लागणारा तांत्रिक संघ तयार करून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर इथे गेल्या वर्षभरात चित्रीकरण केलेले आहे. आता ‘पाच फुटाचा बच्चन’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Jasmin Bhasin Health Update

"मला गंभीर आजार आहे", सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.