मंगळवार, जुलै 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 27, 2026 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jasmin Bhasin Health Update

"मला गंभीर आजार आहे", सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि...

Jasmin Bhasin Health Update : टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन गेल्या दीड महिन्यांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत आहे. गेल्या महिन्यात, तिच्या वाढदिवसाच्या वेळी, तिला दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्याची छायाचित्रे तिच्या प्रियकर आणि अभिनेता अली गोनीने शेअर केली होती. दरम्यान, जास्मिनने आता तिच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला असून डॉक्टरांना गंभीर आजार असल्याचा संशय आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अलीकडेच, पिंकविलाशी झालेल्या संभाषणात जास्मिन म्हणाली, “दुबईला पोहोचल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागले आणि दुसऱ्या दिवशी मला ताप आल्यासारखे वाटले. मला वाटले की हे थकव्यामुळे झाले आहे, म्हणून मी पॅरासिटामॉल ड्रिप आणि IV द्रवपदार्थ घेतले. पण ३ दिवस ताप उतरला नाही आणि माझी प्रकृती आणखीनच बिघडली. मग मी अली आणि मित्रांना मला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले”.

आणखी वाचा – तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जस्मिन पुढे म्हणाली, “शरीरातील संसर्ग आणि जळजळ किती आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी सीआरपी चाचणी केली, ज्यामध्ये सामान्य पातळी 0 ते 5 आहे. परंतु माझे प्रमाण 323 होते, जे माझ्यासाठी खूप धोकादायक आहे. डॉक्टरांनी मला सांगितले की माझ्या आतड्याच्या एका भागात सूज आली आहे, त्यामुळे गंभीर आजाराचा संशय आहे. अजूनही तपास सुरू असून उपचार सुरू ठेवण्यासाठी मी भारतात आले आहे”. आता जस्मिन तिच्या तब्येतीबद्दल म्हणाली, “देवाच्या कृपेने मी आता बरी आहे, पण गेल्या दीड महिन्यापासून मी वारंवार आजारी पडत होते. आता ‘मी ठीक आहे’ म्हणायलाही भीती वाटते. मला वाटते की देव मला थोडा वेळ थांबण्याचा आणि स्वतःसाठी वेळ काढण्याचा आणि स्वतःवर प्रेम करण्याचा इशारा देत आहे. आता मी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेत आहे”.

आणखी वाचा – दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जस्मिनला टर्मिनल आयलिटिस नावाचा आजार आहे, ज्यामध्ये लहान आतड्यात सूज येते. या आजारामुळे पोटदुखी, उलट्या, सूज आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. हे दीर्घकाळ चालू राहिल्यास समस्या वाढू शकते. कामाबद्दल बोलायचे तर ती अलीकडेच ‘खतरों के खिलाडी 15’ या रिॲलिटी शोचे शूटिंग करत होती, जो 1 ऑगस्टपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

Tags: entertainmenthealth updateJasmin Bhasin
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Next Post
stories of Abhay Verma

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि...; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.