मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साऊथ अभिनेत्याची मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक; अपघातादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 3, 2026 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actor Siddharth Prabhu Hit & Run Case

साऊथ अभिनेत्याची मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक

Actor Siddharth Prabhu Hit & Run Case: सध्या हिट अँड रनचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. नुकतीच केरळमध्ये देखील हिट अँड रनची एक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ प्रभू याने मद्यधुंध अवस्थेत केलेल्या बेजबाबदार कृत्यामुळे मनोरंजनविश्वात एकाच खळबळ उडाली उडाली आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये गोंधळ उडाला असून सिद्धार्थविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा: लग्नाच्या ९ वर्षांनी आई झाली अभिनेत्री; पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक अन् लेकीचे ‘ते’ क्युट फोटो व्हायरल

२४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कोट्टायम येथे एम. सी. रोडवर ही घटना घडली. सिद्धार्थ, मद्यधुंद अवस्थेत कोट्टायमकडून येत होता. मद्यधुंद असल्यामुळे सिद्धार्थचं त्याच्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याची गाडी समोरच्या वाहनाला धडकली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ५३ वर्षीय कनकराज यांचा यादरम्यान अपघात झाला. कारची जोरात धडक झाल्यामुळे कनकराज गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी सिद्धार्थला घेराव घातला. दारूच्या नशेत असलेल्या सिद्धार्थने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसोबत अभिनेत्यानं भांडण करायला सुरुवात केली आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा देखील प्रयत्न केला. (Actor Siddharth Prabhu Hit & Run Case)

शेवटी चिंघवनम पोलिसांनी सिद्धार्थ प्रभूला ताब्यात घेतलं असून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत होता हे सिद्ध झालं आहे. गंभीर जखमी झालेल्या कनकराज यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, सात दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या कणकराज यांची १ जानेवारी २०२६ रोजी प्राणज्योत मालवली. कनकराज यांच्या निधनानंतर आता सिद्धार्थवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. (Actor Siddharth Prabhu Hit & Run Case)

आणखी वाचा: ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी सरप्राईज, चित्रपट दाखविला आणि…; मुलांचा आनंद गगनात मावेना

Tags: Actor Siddharth Prabhu Hit & Run Casehit and run caseSidharth Prabhutollywood
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Nitibha Kaul Enagaged

लिप किस केलं, गुडघ्यावर बसून प्रपोज अन्…; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखपुडा, 'तो' व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.