मराठी सिनेसृष्टीत ज्या अभिनेत्रींनी एक काळ गाजवला त्या अभिनेत्रींनमध्ये आवर्जून घेतलं जाणार नाव म्हणजे अभिनेत्री अलका कुबल. मालिका, नाटक, चित्रपट सगळ्या माध्यमात त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली आहे.अलका कुबल यांचे नाव घेतले की एक आदर्श पत्नी, सोशिक सून हे जरी डोळ्या समोर येत असले तरी त्यांनी कायम प्रयत्न केला आहे की त्या वेग वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारतील.शुभ बोल नाऱ्या, बाळाचे बाप ब्रम्हचारी,रिक्षावाली या चित्रपटांत त्यांनी वेगळ्या प्रकारच्या भूमिका हाताळल्या.त्यांच्या कामाची पावती त्यांना प्रेक्षकांकडून कायम मिळालीच पण त्या सोबतच चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्या नंतर सुरुवातीच्या काळातच तुझ्यावाचून करमेना आणि स्त्रीधन या चित्रपटातील भूमिकांसाठी सतत दोन वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. (Alka Kubal rejected Hindi films)

अलका कुबल म्हणजे माहेरची साडी असं तर समीकरण आहे. अलका कुबल यांचे नाव आले तर आपसूकच तोंडी माहेरची साडी हे नाव आल्या शिवाय राहत नाही. त्यांच्या माहेरची साडी या चिटपाटला विक्रमी यश मिळाले होते.माहेरची साडी चित्रपटाने आता च्या काळा प्रमाणे म्हंटले तर बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली होती.तेव्हा अमिताभ बच्चन यांचा आज का अर्जुन हा चित्रपट थिएटर मध्ये सुरु होता तरी अलका कुबल यांच्या माहेरची साडी चित्रपटाचे शो हाउसफ़ुल्ल होते.हे मराठी सिनेमाचे एक प्रकारचे यशच होते असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.माहेरची साडीनंतर खऱ्या अर्थाने अलका कुबल यांना प्रचंड ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळाली.
हे देखील पहा : ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
प्रत्येक कलाकाराला हिंदी सिनेसृष्टीविषयी कौतुक असते.मराठी मध्ये अफाट काम केल्या नंतर हिंदी मध्ये काम करण्याची ओढ कलाकारांना असते. याच संदर्भातील अलका कुबल यांच्या बद्दलचा एक किस्सा ललिता ताम्हणे यांनी चंदेरी सोनेरी या पुस्तकात सांगितला आहे.त्यांनी सांगितलं आहे की, साधारणपणे, थोडंफार यश मिळालं, की बऱ्याचशा अभिनेत्री हळूहळू हिंदी चित्रपटांकडे वळतात. हिंदीत यश मिळणं, न मिळणं ही फार पुढची गोष्ट. अलका मात्र कायम मराठी चित्रपट, मराठी सीरियल्स आणि अधूनमधून एखाद्-दुसरं मराठी नाटक करण्यातच रमलेली होती. एकदा गप्पांच्या ओघात मी तिला विचारलंही होतं- “तुला हिन्दी चित्रपटात काम करावंसं नाही का वाटत?”(Alka Kubal rejected Hindi films)
अलका यांनी नाकारले हिंदी चित्रपट (Alka Kubal rejected Hindi films)
अलका चटकन् म्हणाली होती- “एक तर, वाट्टेल ते ड्रेसेस घालायची आणि शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नाही. दुसरं म्हणजे हिन्दी चित्रपटांत उगीचच छोट्या-मोठ्या भूमिका करण्यापेक्षा मराठी चित्रपटांत ‘नायिका’ म्हणून मध्यवर्ती भूमिका करणं केव्हाही चांगलंच नाही का?” अलकाने मागे एकदा दिग्दर्शक ज्योती तं स्वरूप यांच्या ‘नया ज़हर’ नावाच्या एका हिन्दी चित्रपटात एक ‘गेस्ट रोल’ केला होता. पण तो चित्रपट साफ पडला. म्हणजे तो कधी आला आणि गेला, हेसुद्धा कोणाला कळलं नाही. अशा भूमिका करून काय उपयोग? तेव्हापासून अलकाने ठरवलं, की हिन्दी चित्रपटांत अशा छोट्या भूमिका करायच्याच नाहीत.
‘माहेरची साडी’नंतरही अलकाला हिन्दी चित्रपटांच्या खूप ऑफर्स आल्या होत्या. पण अलकाने सगळ्यांना ठाम नकार दिला होता. नाही म्हणायला, ‘धार’ नावाच्या एका हिन्दी चित्रपटात तिने एक ‘गेस्ट अपीअरन्स’ केला होता. एका पत्रकार मुलीची ती भूमिका चित्रपटाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची होती. तो दिग्दर्शक अलकाच्या एका सहकलाकाराच्या ओळखीने आला असल्यामुळेच तिने नाइलाजाने तो चित्रपट केला होता. “एरव्हीसुद्धा, भूमिका स्वीकारताना मी तिची लांबी बघत नाही, तर माझी भूमिका चित्रपटात किती महत्त्वाची आहे आणि त्या भूमिकेत मला अभिनयाला वाव आहे की नाही या गोष्टींचा मी अधिक विचार करते असं त्यांनी सांगितलं होत.म्हणून अलका कुबल हिंदी सिनेसृष्टीत फार पहायला मिळाल्या नाहीत. (Alka Kubal)
हे देखील पहा: आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
मोठ्या पडद्यावर काम केल्या नंतर कलाकार मालिकांन कडे कवचितच वळतात. परंतु इतके सुपरहिट चित्रपट केल्या नंतरही अलका कुबल यांनी मालिका विश्वातील त्यांचा दबदबा आजही कायम ठेवला आहे.कारण अलका कुबल यांचं स्पष्ट म्हणणं होतं की मालिकांमध्ये काम केल्या मुळे जास्त प्रसिद्धी मिळते आणि त्याचा फायदाच होतो.म्हणून आता ही त्या मराठी मालिकां मध्ये पहायला मिळतात. आई माझी काळूबाई, दर्शन,मंगळसूत्र या त्यांच्या काही रिसेन्ट मालिका आहेत. अलका कुबल यांच्या भूमिकांवर आज देखील प्रेक्षक तितकाच प्रेम करतात. (Alka Kubal)
