शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुष्ठरोगी, अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम, व्हिडीओद्वारे म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 14, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla Tar Mag the fame actress Jui Gadkari will help the elderly who are fighting leprosy and orphans video shared on Instagram

जुई गडकरी कुष्ठरोगाशी झुंज देणाऱ्या व अनाथ वृद्धांना करणार मदत, खास व्हिडीओद्वारे केलं आवाहन

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही त्यांच्या अभिनयाबरोबरच सामाजिक भानही जपतात आणि त्यांची हीच कृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. मराठी सिनेसृष्टीतीळ अशा अनेक कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. जुई अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच सामाजिक भानही जपते आणि याच सामाजिक भानमुळे जुई इतरांपेक्षा वेगळी ठरते. ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी तिच्या या मालिकेतील सायली या पात्रामुळे नेहमीच चर्चेत आली आहे. सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी असून, या मालिकेविषयीच्या विविध अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करते. अशातच जुईने सोशल मीडियावर नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. (Jui Gadkari Leprosy Help)

जुई गेली अनेक वर्षे आश्रमात जाऊन कुष्ठरोगाशी झुंज देणाऱ्या व अनाथ वृद्धांना मदत करते. गेली १९-२० वर्षे ती हा उपक्रम करत आहे. यंदाही जुई येत्या दिवाळीत हा उपक्रम करणार असून याबद्दल माहिती देणारा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. जुईने तिचा व्हिडीओ शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, “नमस्कार, मला बरेच जण मॅसेज करत आहेत की, यंदा दिवाळीला शांतीवन मध्ये जाणार आहेस का? आम्हाला मदत करायची आहे. तर यंदा २७ ऑक्टोबर २०२४ रोजी आम्ही तिथे जाऊ आणि तिथल्या आजी आजोबांबरोबर, लेप्रसी (कुष्ठरोगी) बरोबर दिवाळी साजरी करु. तुम्ही जर देणगी देण्यासाठी इच्छुक असाल, तर या व्हिडीओखाली कमेंट करा. मी QR कोड शेअर करेन. धन्यवाद”.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – कॅन्सरमुळे अशी झाली आहे हिना खानची अवस्था, डोळ्यांचा फोटो शेअर करत म्हणाली, “एक काळ असा होता की…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी परत-परत दरवर्षीप्रमाणे हेच सांगेन की, काळजी करु नका. तुम्ही दान केलेले पैसे सुरक्षित हातामध्ये असणार आहेत, ते योग्य ठिकाणी आम्ही दान करत आहोत. शांतिवन, नेरे याठिकाणचे ते आश्रम आहे. तिथे जाण्याचे माझे हे साधारण १९-२० वे वर्ष आहे. तिथे जाऊन आम्ही कुष्ठरोगी आणि निराधार आजी-आजोबांबरोबर एक दिवस साजरा करतो. यात कुणाला मदत करायची असेल तर मला कळवा”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या ट्रॉफीनंतर सूरजला हक्काचं घरही मिळणार, अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले, “प्रत्येकाचं स्वप्न असतं की…”

तसंच जुईने असे म्हटले की, गेल्यावर्षी ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्यांचे नाव तिने ‘शांतिवन’ला मदत करणाऱ्यांच्या यादीत जोडले आणि त्याचा स्क्रिनशॉटही सर्वांना पाठवला. दरम्यान, जुईच्या या सामाजिक भान जपणाऱ्या कृतीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली आम्ही उत्सुक आहोत असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत. तसंच या व्हिडीओखंळे नेटकऱ्यांनी “खूप छान”, “खूप सुंदर”, “तुझं खूप कौतुक” अशाही अनेक कमेंट्स करत तिचे कौतुक केलं आहे.   

Tags: Jui Gadkari Leprosy HelpJui Gadkari Leprosy Help Marathi NewsJui Gadkari Leprosy Help News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actor Sankarshan Karhade shared a video of the audience coming to meet him after his play in Goa

गोव्यात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे भारावून गेला संकर्षण कऱ्हाडे, घरुन एकाने दडपे पोहेही आणले अन्…; म्हणाला, "हा निरोप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.