लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक अशा अनेक क्षेत्रात आपली मुशाफिरी करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार म्हणून संकर्षणकडे पाहिले जाते. त्याने नाटक, मालिका, चित्रपट त्याचबरोबर कवितांचे कार्यक्रम अशा माध्यमातून आपल्या कलेची चुणूक दाखवून दिली. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या कविता व अभिनयामधून चर्चेत राहणारा संकर्षण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. (Sankarshan Karhade Audience Meetup)
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचला. त्याने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्यांच्या यादीत संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरु आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या नाटकाची जोरदार चर्चा आहे. सध्या या नाटकाचे गोव्यात दौरे सुरु आहेत आणि याच दौऱ्यात त्याला नाटकानंतर काही प्रेक्षक येऊन भेटले आहेत.
प्रेक्षकांच्या या भेटीचा व्हिडीओ संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये अनेक चाहते त्याला भेटत आहेत आणि त्याच्यासह संवाद साधत आहेत. तसंच त्यांच्याबरोबर फोटो व सेल्फीदेखील काढत आहे आणि संकर्षणही सर्वांची अगदी प्रेमाने भेट घेत आहेत. तो प्रत्येकाला आपुलकीने भेटत आहे आणि फोटोही देत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनी त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तुही स्वीकारत आहे. एकूणच प्रेक्षकांकडून संकर्षणचे अतीव लाड होतानाचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे आणि संकर्षणही या प्रेमामुळे भारावून गेला आहे.
आणखी वाचा – कुष्ठरोगी, अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम, व्हिडीओद्वारे म्हणाली…
दरम्यान, संकर्षण त्याच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी गोव्यात गेला असताना त्याला हे प्रेक्षक भेटले. या व्हिडीओखाली संकर्षणने असं म्हटलं आहे की, “काय बोलणार गोवेकरांविषयी …??? प्रेम प्रेम प्रेम… कला अकादमी, गोव्याच्या प्रयोगाला तुफान प्रतिसाद दिला. प्रयोगानंतर सगळे प्रेक्षक भेटायला आले . कुणी हातात पत्रं दिलं, कुणी खायला दडपे पोहे आणले, कुणी फ्रेश मॅंगो पल्प दिला आणि हा निरोप सुद्धा की, पुन्हा पुन्हा या’ आनंद वाटला”